जळगावातील सतीश तायडेसह पाच जण वर्षभरासाठी हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव : लोकसभेसह आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या महिनाभरात तीन हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. निवडणुका निर्विघ्न पार पडाव्या, यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत आज जिल्हा पोलिस अधीक्षकांतर्फे शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील सतीश विलास तायडे याच्यासह टोळीतील पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. 

शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील टोळीचा म्होरक्‍या सतीश विलास तायडे याच्यासह विनोद विलास तायडे, महेंद्र विलास तायडे, हरीश बाळू सपकाळे, दीपक ऊर्फ मिरंडा रामदास चौधरी अशा एकूण पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम (55) अन्वये एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. 

दहा दारूविक्रेते हद्दपार 
निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौधरी यांच्यातर्फे रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा दारूविक्रेत्यांना कलम -144/2 अन्वये हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. हद्दपार केलेल्यांमध्ये अंजनाबाई देवचंद सोनवणे, छायाबाई रमेश सकट, पार्वताबाई प्रल्हाद भदाने (तिघे रा. राजीव गांधीनगर), शारदा नथ्थू भालेराव (पिंप्राळा-हुडको), पिंटू सोनू कोळी (पिंप्राळा कोळीवाडा), सुशीलाबाई नथ्थू भिल, ममता सोहन बाटुंगे (दोन्ही हरिविठ्ठलनगर), उत्तम शहादू बाविस्कर, रवींद्र भीमराव साळुंखे, अशोक बाळू कोळी (तिघे रा. समतानगर) अशा दहा दारुविक्रेत्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 

Web Title: marathi news jalgaon haddpar tayde 1 year