सुशिक्षित बेरोजगारांची "मदतीची साखळी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

जळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी "मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत मदतीसाठी पुढाकार घेतला असून, आगामी काळात प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी झटणार असल्याची माहिती तुषार परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस कल्पेश वानखेडे व नचिकेत वैद्य उपस्थित होते. परदेशी यांनी सांगितले, की इंजिनिअरिंग केले असून, सुशिक्षित बेरोजगार आहे. पण काही तरी देण्याच्या दृष्टीने मोफत फुटबॉलचे प्रशिक्षण देतो. तो खासगी क्‍लास घेत असून, यातून मिळणारा पैसा गरजूंना मदतीसाठी वापरतो. यासाठी "मदतीची साखळी' तयार करत असून, ज्याला मदत करतो, त्याच्याकडून अन्य दोघांना मदत करणार, असे लेखी घेत आहे. ही साखळी वाढवायची आहे. जळगाव शहरात मदतीसाठी कुणी सरसावत नाही म्हणून आपण कुणालातरी मदत करावी, या भावनेतून ही संकल्पना राबवत आहे. गरीब, गरजू मुलांना कौशल्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे. यात जुळलेला कल्पेश वानखेडे या गरीब कुटुंबातील मुलाला नृत्याची आवड होती. मात्र, योग्य व्यासपीठ उपलब्ध नसल्याने स्वप्न पूर्णत्वास जाणार नाही, असे त्याला वाटत होते. या दरम्यान कल्पेशची तुषार सोबत ओळख झाल्यानंतर त्याला एका डान्समध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र, ही मदत करीत असताना त्याने कल्पेशकडून पुढच्यांना मदत करणार असल्याचे लिहून घेतले. त्यानुसार कल्पेश वानखेडे हा सुद्धा बालनिरीक्षगृहातील अनाथ बालकांना मोफत नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. या साखळीत आतापर्यंत सात ते आठ तरुण जोडले गेले असून, आगामी काळात ही साखळी वाढेल, असा विश्‍वास परदेशी यांनी व्यक्‍त केला. 

Web Title: marathi news jalgaon help chaine tushar pardeshi