महामार्गावर धावत्या ट्रकला आग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

जळगाव: अमरावती येथून रेडीमेड कपडे घेवून येणाऱ्या ट्रक मध्ये मागे ठेवलेल्या रेडीमेड कपड्याला अचानक आग लागली. ट्रकचालकाने ट्रक तात्काळ रस्त्याच्या कडेला उतरवून ट्रकमधून उड्या मारल्यामुळे ट्रकचालकासह किन्नर हे दोघ बालंबाल बचावले. यावेळी दोन अग्निशामनच्या बंबांनी आग आटोक्‍यात आणली मात्र तो पर्यंत ट्रकमध्ये असलेला संपूर्ण रेडीमेड कपड्यांचा माल जळून खाक झाला होता. 

अमरावती येथून सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा (एमएच 19 एक्‍स 632) क्रमांकाचा ट्रक जळगावात रेडीमेड कपड्यांचा माल घेवून जळगावकडे होता. दरम्यान महामर्गावरुन धावत असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यावेळी ट्रकची मागच्या बाजूने आगीच्या ज्वाला आकाशात उडत असल्याचे दिसताच महामार्गाच्याकडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला आग लागल्याचे सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway truck fire