सरकारला अडचणीत आणून... फडणवीस बघतायेत "मुंगेरीलाल के हसीन सपने' 

सरकारला अडचणीत आणून... फडणवीस बघतायेत "मुंगेरीलाल के हसीन सपने' 
Updated on

जळगाव: देशासह राज्यात "कोरोना'ची गंभीर परिस्थिती असून सर्वांनी एकत्र येवून या संकटाला सामोरे जायला हवे. पण विरोधी पक्ष सरकारच्या सोबत उभे न राहता सरकारला अडचणीत आणून "मुंगेरीलाल के हसीन सपने' हे विरोधीपक्षनेते पाहत असल्याचा शाब्दीक चिमटा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना घेतला. 

जळगाव दौऱ्यावर असतांना त्यांनी आज अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील उपस्थित होते. गृहमंत्री देशमुख म्हणाले, की राज्यातील "कोरोना'ची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळत आहे. राज्यात कोरोना तपासणीची संख्याही वाढविल्याने रुग्णांचीही संख्या वाढलेली दिसत आहे. त्यात मुंबई पुण्याहून मजूर आपल्या घरी परतत असल्याने ग्रामीण भागातही संख्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सरकार परिस्थितीवर लवकरच नियंत्रण आणेल असा विश्‍वास गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला. 

फडणवीस बघताय "मुंगेरीलाल के हसीन सपने' 
राज्यसरकार "कोरोना'च्या संकटावर मात करण्याच्या प्रयत्न असतांना भाजपकडून मात्र सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. फडणवीसांनी गेली पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि संकटात ते सरकारला अडचणीत आणून "मुंगेरीलाल के हसीन सपने' पाहत आहेत. 

गडकरींकडून फडणवीसांनी शिकावे 
भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी हे राज्य शासनाची अनुकूल भूमिका घेत आहेत. त्यामुळे आपण त्यांचे अभिनंदन करतो. गडकरीकडून अडचणीच्या काळात सरकारशी कसे वागावे हे शिकले पाहिजे असा शाब्दीक टोला फडणवीसांना गृहमंत्र्यांनी लगावला. 

रेल्वे मंत्र्याकडून देखील राजकारण 
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावरही मंत्री देशमुख यांनी टीका केली, ते म्हणाले, केंद्रीय मंत्री गोयल हे सुद्धा राजकारण करीत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये वादळ आल्यामुळे तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे गाड्या सोडू नये अशी विनंती केली. अशा स्थितीत गोयल यांनी एका रात्री तब्बल 41 रेल्वे गाड्या सोडण्याचे शेड्यूल राज्य शासनाला दिले. म्हणजे राज्य शासनाची फजिती करण्याचाच प्रयत्न गोयल करीत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com