"हुडको'ने 253 कोटींचा प्रस्ताव केला मान्य 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

जळगाव ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसह घरकुल उभारणीसाठी "हुडको'कडून कर्ज घेतले होते. कर्जाची एकरकमी फेड करण्यासाठी मंत्रिमंडळात पंधरा दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला. यात 253 व 273 कोटी असे दोन प्रस्ताव होते. यात 253 कोटींमध्ये तडजोड झाली असून, संपूर्ण रक्कम भरण्यासाठी शासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. 

"घरकुल'सह विविध योजनांसाठी तत्कालीन जळगाव नगरपालिकेने "हुडको'कडून 141 कोटी 32 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी महापालिकेने आतापर्यंत 375 कोटी रक्कम "हुडको'ला व्याजासकट अदा केली आहे. तसेच दरमहा 3 कोटींचा हप्ता सुरू होता. याबाबत महापालिकेला कर्जातून मुक्त करण्यासाठी आमदार भोळेंचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुरावाला यश येऊन पंधरा-वीस दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व कर्ज एकरकमी शासन भरणार असल्याचा निर्णय झाला होता. शासन व हुडकोमध्ये 253 कोटींमध्ये तडजोड झाली असून, ही सर्व रक्कम शासन भरणार आहे. 

मनपा 50 टक्के रक्कम भरणार 
हुडको कर्जफेडीची 253 कोटींमध्ये तडजोड झाली झाली आहे. यातील शासनाने महापालिकेला 50 टक्के रक्कम माफ केली आहे. शासनाने हुडकोला पूर्ण रक्कम अदा केल्यानंतर 50 टक्के सुमारे 126 कोटी 50 लाख रुपये महापालिका शासनाला तीन कोटीच्या हप्त्यानुसार देणार आहे, असे आमदारांनी सांगितले. 

मनपा कर्जमुक्त करू 
जळगाव शहर महापालिका आता "ड' वर्गात आहे. महापालिकेची कर्जमुक्ती करून तसेच इतर प्रलंबित प्रश्‍न सोडवून "ड' वर्गातील महापालिका "अ' वर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदारांनी सांगितले. 

गाळ्यांचा प्रश्‍न लवकरच मार्गी 
गाळेधारकांना आलेली अवाजवी बिले नियमानुसार कमी करण्यात आली आहेत. त्यांना नोटिसा दिल्या असून, थकीत रक्कम भरण्यासाठी त्यांना विश्‍वासात घेऊन समजावले जाणार आहे. लवकरच प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे आमदार भोळे म्हणाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon hudko 253 carroreprastav