coronavirus दैनंदिन रुग्ण तपासणीही राहणार बंद; आयएमएचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या दृष्टीने जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन घेण्यात येत आहे. यामुळे शहरातील रूग्णालयांमध्ये होणारी दैनंदिन रूग्ण तपासणी बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव आयएमएने घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

जळगाव : कोविड- 19 (कोरोना) चा फैलाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशाने सोमवारपासून (ता.23) जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने जळगाव जिह्यातील सर्व रुग्णालयातील दैनंदिन वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय आयएमए जळगाव शाखेने घेतला आहे. 

नक्‍की वाचा - जनता कर्फ्यु : भुकेने व्याकुळ मनोरुग्णास दिले अन्न- पाणी
 

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या दृष्टीने जिल्ह्यात सोमवारपासून लॉकडाऊन घेण्यात येत आहे. यामुळे शहरातील रूग्णालयांमध्ये होणारी दैनंदिन रूग्ण तपासणी बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव आयएमएने घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच या काळात वैकल्पिक शस्त्रक्रिया देखील बंद ठेवाव्या असे आयएमएचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सर्व डॉक्‍टरांना सूचित केलेले आहे. हा निर्णय जिह्यात लॉक डाऊन असेपर्यंत राहील. रुग्णालयात अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार असल्याने रुग्णासोबत केवळ एकाच नातेवाईकाने थांबावे. डॉक्‍टरांशी योग्य ती काळजी घेऊन, योग्य अंतर ठेवून संपर्क साधावा. रुग्णालयाच्या प्रतिक्षालयात गर्दी करू नये. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील योग्य ती खबरदारी घ्यावी या संदर्भातील बोर्ड प्रत्येक रुग्णालयात लावण्यात आला आहे. रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयएमएचे सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी कळविले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Ima decision opd closed corona virus