esakal | हे काय...भारतात 70 टक्के "मधुमेही' 
sakal

बोलून बातमी शोधा

हे काय...भारतात 70 टक्के "मधुमेही' 

हे काय...भारतात 70 टक्के "मधुमेही' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : स्पर्धेच्या युगात स्वत:साठीही वेळ गमावून बसलेल्या माणसाला या बदलत्या जीवनशैलीने दिलेल्या अनेक शापांपैकी मधुमेह हा मोठा "शाप' आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 मध्ये भारत मधुमेहींचा केंद्रबिंदू ठरेल, अशी व्यक्त केलेली भीती त्यामुळेच दुर्दैवाने खरी ठरली. सद्य:स्थितीत भारतात प्रत्येक दहा व्यक्तींमागे सात अर्थात 70 टक्के "मधुमेही' असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 
सन 2010 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील मधुमेहींबाबत भाकीत केले होते, त्यात 2015 पर्यंत भारत मधुमेहींचे प्रमुख केंद्र बनेल, असे म्हटले होते आणि ही भीती खरी ठरली. अर्थात, गेल्या दोन दशकांपासूनच त्याचे संकेत मिळत होते. परंतु, आरोग्याबाबत उदासीन असलेल्या भारतीयांना तो धोका त्यावेळी ओळखता आला नाही. 

मधुमेह पोचला घराघरांत 
त्याचाच परिणाम म्हणून की काय, आज मधुमेह भारतातील प्रत्येक घरात पोचला आहे. सुरवातीला हा रोग अनुवांशिकतेमुळेच होतो, असे मानले जात होते. आता मात्र प्रत्येक घरात किमान एक मधुमेही असल्याने तो समज दूर झाला आहे. विशेष म्हणजे, स्त्रियांमध्येही मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात आले आहे. घरातील कामे करते म्हणून आपला व्यायाम होतो, त्यामुळे मधुमेह होणार नाही, हा महिलांचा गैरसमज. तोदेखील त्यांच्यातील वाढत्या प्रमाणाने बाजूला पडला. 

जीवनशैलीचा शाप 
नियमित व्यायाम नसल्याने झालेला कुठलाही आजार औषधींनी कसा बरा होईल? मधुमेह त्याचेच द्योतक आहे. आपण रोज किती कार्बोहायड्रेटस्‌, फॅट्‌स खातो, किती बर्न करतो, हे आपल्यालाच माहीत नसते. केवळ चवीला गोड पदार्थ खाल्ल्यानेच शुगर वाढते, हा आणखी एक गैरसमज. त्यामुळेही मधुमेहाबद्दलची उदासीनता दिसून येते. केवळ दारू, सिगारेट, तंबाखू हीच व्यसने आपण मानतो. मात्र, चहा हे व्यसन मानायला आपण तयार नाही, त्यातूनही मधुमेहाचे प्रमाण वाढतेय. 

जीवनशैलीत बदल आवश्‍यक 
- नियमित व्यायाम आवश्‍यक 
- "लो कार्बो डायट' घ्या 
- चहासह व्यसनांपासून दूर राहा 
- लवकर झोपून, लवकर उठा 
 
मधुमेह होऊच नये म्हणून आपण आदर्श जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. तरीही हा आजार जडलाच तर तो पूर्ण बरा होऊ शकतो, त्यासाठी काही पथ्ये पाळली पाहिजेत. जीवनशैली बदलली पाहिजे. त्यासाठी डॉ. श्रद्धा माळी यांच्या सहकार्यातून आम्ही समाजात जनजागृतीपर उपक्रम राबवीत आहोत. नागरिकांनी त्याला साथ द्यावी. 
- डॉ. श्रेयस महाजन 
 

loading image