इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेत दहा हजार खाते 

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेत दहा हजार खाते 

जळगाव ः देशात संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्याच्या दृष्टीने डिजिटल इंडिया ही संकल्पना राबविण्यास सुरवात करण्यात आली. या अंतर्गत टपाल विभागामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक सुरू करण्यात आली आहे. साधारण वर्षभरापूर्वी ही बॅंक सुरू करण्यात आली असून, जळगाव विभागात दहा हजारांपेक्षा अधिक बॅंक खाते उघडण्यात आल्याची माहिती डाक अधीक्षक राजेश रनाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
डाक विभागाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस कार्यालयातील संतोष जलंकर, सचिन महाजन उपस्थित होते. श्री. रनाळकर यांनी सांगितले, की इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमार्फत ग्राहकांना अन्य बॅंकेत मिळणाऱ्या सुविधेप्रमाणे सुविधा आहे. इतकेच नाही तर अन्य बॅंकांप्रमाणे खात्यात काही विशिष्ट रक्‍कम असणे बंधनकारक नाही. शिवाय मोबाईल ऍप असल्याने व्यवहार करणे अधिक सोयीचे आहे. कुठल्याही बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर करणे किंवा इतर बॅंक खात्यातून पैसे हस्तांतरित करता येणार आहे. मुळात अनेकदा पीन विचारून पैसे काढण्याचा प्रकार होत असतो. पण पोस्ट खात्याच्या बॅंकेत असा प्रकार होणे शक्‍य नाही. कारण बायोमेट्रिक सिस्टिम असल्याने खातेदाराचे थंम्प घेतल्याशिवाय पैसे काढता येणे शक्‍य नाही. सप्टेंबर 2018 मध्ये ही बॅंक सुविधा सुरू झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजारांहून अधिक खाते उघडण्यात आले असून, 15 मे ते 15 जून या महिनाभराच्या कालावधीत 6 हजार खाते उघडण्याचे काम झाले आहे. तर सुकन्या योजनेंतर्गत 9 हजार खाते उघडण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांचेही उघडणार खाते 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इतर बॅंकांमध्ये खाते उघडणे सोपे होत नाही. कारण बॅंक खात्यात विशिष्ट रक्‍कम असल्याने ते सुरू ठेवता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन तेथे कॅम्प लावणार आणि इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेत विद्यार्थ्यांचे खाते उघडून घेणार असल्याचे श्री. रनाळकर यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री सुरक्षा योजनेत द्वितीयस्थानी 
पोस्ट कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजनेसह अन्य सुरक्षा योजनेत जळगाव विभागाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत जळगाव विभागातून 13 हजार ग्राहकांना सेवा देण्यात आली असून, औरंगाबाद विभागांतर्गत असलेल्या 11 विभागीय कार्यालयांत जळगाव विभाग दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याचे श्री. रनाळकर यांनी सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com