इन्जेक्‍शन देताच गृहस्थाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चाळीसवर्षीय बांधकाम मिस्त्री असलेल्या गृहस्थाला आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्‍टरांकडे दाखल केले. डॉक्‍टरांनी इन्जेक्‍शन देताच संजय गांगुर्डे यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या प्रकरणी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता. जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून इन कॅमेरा शवविच्छेदनाशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. 

मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार, संजय भिवसन गांगुर्डे यांना रात्री पासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आज डॉ. नवल पाटील यांच्या रुग्णालयात आणले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यावर इन्जेक्‍शन दिले. त्यानंतर संजय यांना घाम सुटून ते खाली कोसळले, डॉ. नवल यांनी सहकारी डॉक्‍टरांना बोलावून त्याच अवस्थेत त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी तातडीने ओम क्रिटिकल या ट्रॉमासेंटर मध्ये रुग्णाला हलवल्यावर डॉक्‍टरांनी तपासणी केली मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांनी आक्रोश करीत डॉक्‍टरांवर आरोप करीत गोंधळ घातल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, अनिल फेगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु कुटुंबीयांनी वैद्यकीय समिती समोर शवविच्छेदन करावे अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या पश्‍च्यात पत्नी कल्पना, मुलगा आकाश (वय-11), बंटी (वय-9), मुलगी पूजा (वय-12) असा परिवार असून कुटुंबातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय उघड्यावर आल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली. 

Web Title: marathi news jalgaon injection man death