जैन समाजाचे क्रांतीकारी पाऊल... महावीर कल्याण महोत्सव अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड 

bharati raison
bharati raison

जळगाव :जळगाव जैन समाजाने महिलेला प्राध्यान्य देत प्रथमच क्रांतीकारी पाऊल टाकले असून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सौ.भारती प्रदीप रायसोनी यांची निवड केली आहे. भारतात जैन समाजाच्या महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महिलेची ही प्रथमच निवड करण्यात आली आहे. 

जैन धर्मीयांतर्फे दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह दि 4, 5 व 6 एप्रिल 2020 दरम्यान भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात येईल. भव्य महोत्सवाच्या नियोजनासाठी सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांच्या अध्यक्षतेखाली समाजबांधवांची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सौ. भारती प्रदीप रायसोनी यांची निवड करण्यात आली. 

भारतीय जैन संघटनेच्या सभागृहात झालेल्या समाजबांधवांच्या सभेला अशोकभाऊ जैन, अजय ललवाणी, स्वरूप लुंकड, राजेश श्रावगी-जैन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमूते भारती रायसोनी यांची भगवान कल्याणक महोत्सवाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन केल्या जातील. 
यावेळी उद्योगपती अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले. तेम्हणाले,भारतात जैन समाजात श्री संघीय कार्यासाठी जळगावचे नाव सुप्रसिध्द आहे. पूर्वजांनी घेतलेल्या मेहनतींमुळे हे शक्‍य झाले. तीच परंपरा जोपासल्यास समाजात एकता, सलोखा कायम ठेवत आपला आदर्श सर्व श्री संघ घेतील. पहिल्यांदा भगवान महावीर कल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महिलेची निवड करण्यात आली. त्यांना सर्वांनी एकदिलाने सहकार्य करूया असे आवाहन करत युवकांनी आपआपसातील मतभेद दूर ठेऊन समाज कार्यात आपले योगदान द्यावे त्यायोगे जैन धर्माची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

नक्की वाचा :  नेत्यांचे फोटो होळीमध्ये दहन करत... शेतकऱ्यांनी ठोकल्या बोंबा ! 

याप्रसंगी दलिचंदजी जैन, अजय ललवाणी, स्वरूप लुंकड, नगरसेवक अमर जैन, भारती रायसोनी यांनीही मार्गदर्शन केले. सभेस नरेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्‍या, नंदलाल गादिया, विजय सांड, ममता कांकरिया, श्रेयस कुमट, हेमंत कोठारी, संजय रेदासनी, जितेंद्र कोठारी, विशाल चोरडिया, नरेंद्र बंब, संजय गांधी, विजय लुनिया, महेंद्र जैन, मनिष लुंकड, नितीन चोपडा, अनिल कोटेचा, अजित कोठारी, अनिल पगारीया, अनिल सांखला, तेजस कावडिया, प्रविण पगारीया आदींसह समाजातील सर्व महिला मंडळ, युवा मंडळ, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com