जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

जळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर केळी फेको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना केळी फेकण्यास मज्जाव केला असता, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्‍काबुक्‍की झाली. 

जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या जलसंपदा मंत्री महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी किसान सभेच्यावतीने केळी फेक आंदोलन करण्यात आले. यामुळे साधारण पऊण तास वाहतुक थप्प होती. जिल्ह्यात 1, 5 व 6 जुनला झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे रावेर, मुक्‍ताईनगर, यावल, चोपडा आदी आठ तालुक्‍यात केळी उत्पादकांचे सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज केळी फेको आंदोलन केले. शेतकऱ्यांना त्वरीत केळी नुकसानीचे पॅकेज मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी देखील झाली. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी किसान सभेचे सोपान पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरूण पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोर्ट चौकात आंदोलकांनी ठिकठिकाणी केळी फेकल्याने वाहतुक खोळंबली होती. 

Web Title: marathi news jalgaon jalsampda mantri banana fek farmer