तरच जिल्हा होईल "पाणीदार' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जळगाव ः जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढावे यासाठी जलसंधारणाची विविध माध्यमातून कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियान योजना त्यातील. सोबतच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती मिळाली आहे. यामुळे जलसिंचन होईल. गेल्या तीन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियानासारखी योजना राबवीत असताना आजमितीस जिल्ह्यातील साठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जलसंधारणाच्या कामे जलद गतीने होणे, दर्जेदार कामे झाली तरच त्याद्वारे भूगर्भात पाणी साठी होऊन गावे टॅंकरमुक्त होतील. 

जलयुक्त शिवार अभियान व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढण्यासाठी जिल्ह्याला 2 कोटी 16 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर व पारोळा या तालुक्‍यांना प्रत्येकी 20 लाख रुपये, जळगाव, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ व एरंडोल या तालुक्‍यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर चोपडा, रावेर, यावल या तालुक्‍यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

गावे "जलयुक्त'चा दावा झाल्याचा फोल 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या ताळेबंदानुसार 2016-17 मधील जिल्ह्यातील सर्व 222 गावे जलयुक्त झाल्याचा दावा कृषी अधीक्षक कृषी कार्यालय करते. त्यात जामनेर तालुक्‍यातील सर्वाधिक 26 गावे, तर चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्‍यातील प्रत्येकी 20 गावांचा समावेश आहे. गावे जलयुक्त झाली असताना जिल्ह्यात साठ टॅंकर द्वारे पाणी पुरविले जाते. जामनेर तालुक्‍यात सध्या 24 गावांना 21 टॅंकर सुरू आहे. पारोळ्यात 13 गावांना सहा टॅंकर सुरू आहेत. 
 
या कामांचा समावेश 
"जलयुक्त शिवार' योजनेंतर्गत 117 कोटींची सहा हजार 936 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेच्या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील फक्त 232 गावांची निवड करण्यात आली होती. त्यात सात हजार 200 कामे करावयाची होती. त्यापैकी सहा हजार 963 कामे (90 टक्के) झाली आहेत. "जलयुक्‍त शिवार' योजनेंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध, विहीर पुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. 

40 टक्के काम अपूर्णच! 
योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 222 गावांची निवड झाली. त्यात 4 हजार 271 कामे प्रस्तावित आहे. त्यातील केवळ दोन हजार काम प्रगतिपथावर आहेत. पावसाळा सुरू होण्यास केवळ एकवीस दिवसांचा कालावधी आहे. कमी कालावधीत काम पूर्ण कशी होणार ? घाईगडबडीत कामे करावयाची असतील तर त्यांचा दर्जा कसा असेल ? याबाबत न सांगितलेले बरे. जलयुक्तच्या कामांसाठी चाळीस कोटींचा निधी मंजूर आहे. त्यातील दहा कोटी आलेले आहेत. 
 
Web Title: marathi news jalgaon jalyukt shivar