जिल्हा बॅंकेत लवकरच कर्मचारी भरती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत कर्मचाऱ्याची 400 पदे रिक्त आहेत. त्या भरण्यास शासनानेही मंजुरी दिली आहे. बॅंकेतर्फे आता ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्याची चर्चा आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्यांचा अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, अनिल भाईदास पाटील, नानासाहेब देशमुख, तिलोत्तमा पाटील, संजय पवार, गणेश पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना किशोर पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने जिल्हा बॅंकेत रिक्त असलेल्या पदाच्या भरतीला परवानगी दिली आहे. यात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे असा संचालकांचा आग्रह होता. त्यामुळे नोकर भरतीची ही प्रक्रिया लांबली होती. मात्र आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नोकर भरतीबाबत चर्चा झाली. या शिवाय मधुकर सहकार साखर कारखान्याने पाच कोटी रुपये कर्जाची मागणी केली आहे. शासनाने लागू केलेल्या अटींनुसार परवानगी घेऊन कर्ज देण्याचा निर्णय केला जाईल. बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन त्यास मंजुरी देण्यात आली. 

चारशे पदे रिक्‍त 
जिल्हा बॅंकेत जवळपास 400 पदे रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात किती पदे भरावी? आरक्षण कसे असावे? याबाबतच प्रस्ताव केंद्र सरकारच्या "आयबीपीएस' या कंपनीला दिला जाणार आहे. त्यांच्यामार्फत ही भरती करण्यात येईल. पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाबाबत चर्चा होऊन नोकर भरतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon jilha band bharti