जिल्हा बॅंकेकडून कर्ज वाटप सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जळगाव ः नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफीच्या चक्रव्यूहात राज्यातील जिल्हा बॅंका अडचणीत आलेल्या असताना जळगाव जिल्हा बॅंकेला मात्र गेल्या आर्थिक वर्षात 66 कोटी 87 लाख 8 हजार रुपयांचा नफा झाला असून, बॅंकेकडून पीक कर्ज वाटप सुरू झाल्याची माहिती बॅंकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यांनी 31 मार्च 2018 ला झालेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला. पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितले, की बॅंकेच्या सर्व प्रकारच्या ठेवी 2986 कोटी 62 लाख 88 हजार पर्यंत गेल्या आहेत. तसेच बॅंकेच्या व्यवसायात वाढ झालेली असून, सद्यःस्थितीत एकूण व्यवसाय 4684 कोटी 73 लाख रुपये आहे. खरीप हंगामासाठी बॅंकेतर्फे पीक कर्ज वितरण सुरू करण्यात आले आहे. बॅंकेने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या रूपे किसान कार्डद्वारे पीककर्ज वितरण सुरू केले आहे. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते. 

बॅंकेत अत्यंत काटकसरीचे धोरण राबविण्यात आले. संचालक मंडळावर होणारे अतिरिक्त खर्च बंद करण्यात आले असून, पारदर्शक व्यवहार केल्याने बॅंकेची आर्थिक स्थिती यंदा मजबूत झाली आहे. 
ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर, चेअरमन, जळगाव जिल्हा बॅंक 

Web Title: marathi news jalgaon jilha bank