जिल्हा बॅंकेतर्फे 27 हजार शेतकऱ्यांना 270 कोटी कर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे खरीप हंगामासाठी 27 हजार 489 शेतकऱ्यांना 270 कोटी 5 लाख 70 हजार 289 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक 53 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे. 

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे खरीप हंगामासाठी 27 हजार 489 शेतकऱ्यांना 270 कोटी 5 लाख 70 हजार 289 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक 53 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे. 
जिल्हा बॅंकेचे साधारणत: साडेतीन लाख सभासद आहेत. मात्र त्यातील काही थकबाकीदार असल्यामुळे बॅंकेने यावेळी त्यांना केवळ 50 टक्केच कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकऱ्यांनी 50 टक्केही कर्ज नाकारले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 27 हजार 489 शेतकऱ्यांनीच कर्ज घेतले आहे. त्यामुळे यावेळी कर्ज वाटपाची बॅंकेची टक्केवारी पूर्णपणे घसरली आहे. चाळीसगाव तालुका मोठा असल्यामुळे चार हजार 20 शेतकऱ्यांना 53 कोटी 7 लाख 84 हजार 884 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. लहान असलेल्या बोदवड तालुक्‍यात सर्वांत कमी 184 शेतकऱ्यांना1कोटी 6लाख 84 हजार 200 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. 

ऊस, केळी कांदेबागची संख्या कमी 
केळी कांदेबाग पिकासाठी 96 शेतकऱ्यांना 68 कोटी12 लाख 35 हजार 251 रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे,ऊस पिकासाठी 69 शेतकऱ्यांनी 60 कोटी 20लाख 49 हजार 38रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर कापूस व इतर पिकासाठी 27हजार 304 शेतकऱ्यांना 141 कोटी 72लाख 86 हजाराचे कर्ज वाटप करण्यात आले. 

तालुकानिहाय कर्जवाटप असे 

कंसात शेतकऱ्यांची संख्या 
अमळनेर -(1938)- 8,89,38, 770 
भडगाव- (2298) -49,79,20,773 
भुसावळ- (475)-22,1,94,950 
बोदवड- (184)-1,06,84,200 
चाळीसगाव (4020)-53,07,66,884 
चोपडा- (2744)-20,63,82,970 
धरणगाव- (524)-2,88,88,640 
एरंडोल- (1216)-7,95,71,432 
जळगाव- (2593)-16,61,36,489 
जामनेर- (2591)-10,31,38,180 
मुक्ताईनगर- (706)-4,31,93,700 
पाचोरा- (3088)-18,28,47,825 
पारोळा-(3388)-19,13,696,92 
रावेर- (585)-6,11,29,238.28 
यावल- (2231)-48,74,08,546 

 
थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही, ती संख्या यावेळी खूप जास्त आहे. नियमित कर्जफेड करणारे व कर्ज माफ झालेले, ज्यांच्यावर थकबाकी नाही अशा सर्वच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. इतर कोणत्याही बॅंकेपेक्षा जिल्हा बॅंकेचे कर्जवाटपाचे प्रमाण यावेळीही जास्तच आहे. 
- रोहिणी खडसे- खेवलकर, चेअरमन, जिल्हा सहकारी बॅंक. 
 

Web Title: marathi news jalgaon jilha bank karj