राजकारण न केल्याने जिल्हा दूध संघ, बॅंक चांगल्या स्थितीत : एकनाथराव खडसे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

जळगाव: राजकारण बाजूला सारून काम केल्यास सहकारी संस्था चांगल्या चालतात, जिल्हा बॅंक व जिल्हा दूध संघ त्याचे चांगले उदाहरण आहे. मात्र त्यात राजकारण घुसले कि त्याचे वाटोळे होते. असे परखड मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे बोलतांना व्यक्त केले. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 

जळगाव जिल्हा दूध संघाची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल क्रेझी होम येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा सौ.मंदाकिनी खडसे होत्या. तर आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी खासदार वसंतराव मोरे आदी संचालक तसेच सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलतांना एकनाथराव खडसे म्हणाले, कि राजकारणाचे सर्व विषय बाजूला ठेवून जर संस्था चालविल्या तर त्या अत्यंत चांगल्या चालतात, जळगाव जिल्हा सहकारी बॅंक व जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या ठिकाणी राजकारण न करता सर्वपक्षीय संचालक चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही संस्था अत्यंत चांगल्या स्थितीत सुरू आहेत. जिल्हा दूध संघाचे उत्पादन वाढीविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कमी खर्चा जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण करण्याची गरज असून आहे. यासाठी प्रशिक्षण सुरू करावे व दरवर्षी किमान 500 शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे असे अवाहनही त्यांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha dudh sangh khadse