जि. प.च्या जुन्या इमारत निर्लेखनाचा सर्वसाधारण सभेत मांडणार ठराव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

जळगाव : ब्रिटीशकाळात बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीचे बांधकाम जुने झाले असून, गळती लागली आहे. ही जीर्ण झालेली ब्रिटीशकालीन वास्तू पाडण्यासाठीचा निर्लेखनाचा ठराव पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सदर इमारत पाडून शासनाकडून निधी मागवून नवीन वास्तू उभारण्याचा ठरावही केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीला पाडण्याचा प्रस्ताव गेल्या पंचवार्षिकमध्ये झाला होता. मात्र बांधकाम बीओटी तत्त्वावर केले जाणार असल्याने या कामाला खोडा बसला. मात्र, आता या इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार वास्तू जीर्ण झाली असल्याने आधी तिचे निर्लेखन करण्याचा ठराव केला जाणार आहे. येत्या 7 सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला जाण्याची शक्‍यता आहे. इमारतीचे निर्लेखन करून त्या जागी बीओटी तत्त्वावर बांधकाम न करता शासनाकडून निधी मागवून प्रशासकीय इमारत उभारण्याचा आग्रह राहणार आहे. इमारतीसाठी पार्किंग व्यवस्थाही करावी, असा ठरावही करण्यात येणार आहे. परंतु ही इमारत बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्यास व व्यापारी गाळे काढण्यास सदस्यांनी विरोध केला आहे. त्याचप्रमाणे राजकमल चित्रपटगृहातील मध्यवर्ती ठिकाणी जि. प.ची जागा आहे. ही जागा विकसित करून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. 

"शिवतीर्थ'वर व्यापारी गाळे 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील शिवतीर्थ मैदान हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. जि. प.कडून दरवर्षी या मैदानाच्या उत्पन्नापेक्षा कर अधिक भरण्यात येतो. त्यामुळे मैदानाच्या बाजूने "एल' आकारात व्यापारी गाळे उभारावेत, यासाठी जि. प.च्या सभेत चर्चा केली जाणार आहे. यामुळे जि. प.च्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha parishad old diulding nirlekhan