esakal | जळगाव मनपा अंदाजपत्रात स्थायी समितीकडून 154 कोटीची वाढ ! 

बोलून बातमी शोधा

जळगाव मनपा अंदाजपत्रात स्थायी समितीकडून 154 कोटीची वाढ ! 

2020-21 या वर्षाचे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. जळगाव शहर विकास, महापालिका उत्पन्नवाढच्या अनुषंगाने अर्थसंकल्प असल्याचा विश्‍वास सभापती ऍड.हाडा यांनी व्यक्त केला.

जळगाव मनपा अंदाजपत्रात स्थायी समितीकडून 154 कोटीची वाढ ! 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : महापालिकेचे प्रशासकीय कामकाज सुसज्ज करून उत्पन्न वाढीच्या तरतुदी सुचवित स्थायी समिती सभापतींनी विविध मुद्दे अंदाजपत्रात वाढीवीले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दिलेले 1141 कोटी 96 लाख रुपयांचे अंदाजपत्रात उत्पन्न आणि खर्चाची बाजू लक्षात घेवून 154 कोटी 90 लाख रुपयांची वाढ करत 1291 कोटी 76 लाखाचे अंदाजपत्र स्थायी समितीत आज सर्वानुमते मंजूर होत ते महासभेपुढे ठेवले आहे. 

आर्वजून पहा : " महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी; पदाधिकारी नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस
 

महापालिकेने 2020-21 या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे मांडले होते. त्यानुसार स्थायी समितीने 
अभ्यास करत आज अंदाजपत्रासाठी घेण्यात आलेल्या स्थायी समितीची सभापती ऍड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपायुक्त अजित मुठे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी कपील पवार, मुख्यलेखापरिक्षक संतोष वाहुळे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, नगरससचिव सुनील गोराणे आदी अधिकारी उपस्थित होते. 

क्‍लिक कराः मनपा'च्या नियोजनशून्यतेमुळे 75 कोटी कचऱ्यात! 
 

यावेळी सभापतींनी महापालिकेचे 2020-21 या वर्षाचे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. जळगाव शहर विकास, महापालिका उत्पन्नवाढच्या अनुषंगाने अर्थसंकल्प असल्याचा विश्‍वास सभापती ऍड.हाडा यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात त्यांनी बगीच्यासह शिवाजी उद्यान विकसीत करुन त्याठिकाणी थीम पार्क,बटरफ्लॉय, बॉटनिकल उद्यानासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी 15 कोटी, नवीन रस्त्यांसाठी 70 कोटींची तरतूद करुन मुलभूत सुविधांसह शिक्षण, पर्यावरणावर भर देण्याचा अंर्थसंकल्पात प्रयत्न केलेला आहे. 

नक्की वाचा : गो...कचरा...गो, गो...वॉटर ग्रेस...गो !