गो...कचरा...गो, गो...वॉटर ग्रेस...गो ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

नागरिकांना आता गो...कचरा...गो, गो...वॉटर ग्रेस गो ! असे म्हणण्याची वेळ आली असल्याचा निषेध व्यक्त केला. 

जळगाव : रामदास आठवलेंचा गो...कोरोना...गो चा व्हिडीओ सद्या सोशल मिडीयावर जोरदार सुरू आहे. याचीच प्रचिती आज जळगाव महापालिकेच्या अंदाजपत्राबाबत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाहण्यास मिळाली. यात शहरात कचऱ्याची समस्या सुटत नसून महापालिका प्रशासन सफाई मक्तेदाराबाबत 
कोणती ही कारवाई करण्यासंदर्भात भूमीका घेत नसल्याने नागरिकांना गो...कचरा...गो, गो... वॉटर ग्रेस...गो अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचे रामदास आठवले स्टाईल मागणी केल्याने सभागृहात ऐकच हशा पिकली. 

आर्वजून पहा : " महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी; पदाधिकारी नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस*
 

जळगाव शहर महापालिकेत अंदाजपत्राबाबत स्थायी समितीची सभा आज झाली. यात शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी महापालिकेने स्वच्छतेचा कर लावलेल्या मुद्यावरून बोलताना ते म्हणाले, की जळगाव शहर महानगर पालिकेने शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला. पाच महिन्यापासून मक्तेदार काम सुरू असून मक्तेदाराच्या पाच महिन्यापासून शहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी वाढतच आहे. त्यात गेल्या वीस दिवसापासून शहरातील स्वच्छतेचे काम अचानक मक्तेदाराने बंद केल्याने शहरात सर्वत्र कचरा साचलेला आहे. त्यामुळे शहरातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यात आमदार सुरेश भोळे यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेत मक्तेदाराचा मक्ता का रद्द केला जात नाही अशी लक्षवेधी सुचना मांडली होती. तरी देखील महापालिका प्रशासन मक्तेदारावर का कारवाई केली नाही. मक्तेदार आता न्यायालयात गेला असून स्वच्छतेचा प्रश्‍न मात्र अजून तसाच आहे. त्यामुळे नागरिकांना आता गो...कचरा...गो, गो...वॉटर ग्रेस गो ! असे म्हणण्याची वेळ आली असल्याचा निषेध व्यक्त केला. 

क्‍लिक कराः मनपा'च्या नियोजनशून्यतेमुळे 75 कोटी कचऱ्यात! 
 

स्वच्छतेचा कर माफ करण्याची मागणी 
शिवसेनेतर्फे अंदाजपत्रकात महापालिकेने नागरिकांवर लावलेला 2 टक्के स्वच्छता कर हा माफ करवा अशी 
मागणी केली. यात लढ्ढा म्हणाले, दोन वर्षापासून घनकचरा प्रकल्प सुरू झालेला नसून, शहरातील नागरिकांना आपण स्वच्छतेचा सुविधा देखील देत नसल्याने स्वच्छतेचा कर माफ करावा अशी मागणी केली. यावर सभापतींनी प्रशासनाने याबाबत नियमानुसार काय करता येईल हे बघावे अशी सुचना केली. 

नक्की वाचा :कोरोनाचा कृषिक्षेत्रालाही दणका; पोल्ट्री, शेतमालाचेही भाव गडगडले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jmc styandig cumeety meting A daily hygienist agenci eshu