महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी; पदाधिकारी नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

जळगाव: महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पालिकेतील सदस्यांना पदाची संधी मिळावी, यासाठी दहा महिन्यांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, आता यावरूनच वाद सुरू झाला आहे. याबाबत नेत्यांनी आदेश देऊनही फारसा फरक पडत नसल्यामुळे सध्यातरी अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. 

जळगाव: महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पालिकेतील सदस्यांना पदाची संधी मिळावी, यासाठी दहा महिन्यांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, आता यावरूनच वाद सुरू झाला आहे. याबाबत नेत्यांनी आदेश देऊनही फारसा फरक पडत नसल्यामुळे सध्यातरी अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. 

पालिकेत आमदार सुरेशदादा जैन नेतृत्वाखाली सत्ता असताना नगरसेवकांना सत्तेतील पदाचा लाभ व्हावा, यासाठी एक वर्षाची पदनियुक्ती करण्यात आली होती. कालावधी संपल्यानंतर पदाधिकारी राजीनामा देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती. त्यावेळी अनेकांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, स्वीकृत नगरसेवक पदही मिळाले होते. त्यावेळी जळगावचा पदाधिकारी नियुक्तीचा "कालावधी पॅटर्न' राज्यभरात चर्चेतही होता. 

क्‍लिक कराः  world kidney day : उच्चरक्‍तदाब, मधुमेहींना जडतोय किडनीचा विकार
 

जळगाव महापालिकेत 2019 मध्ये सत्तांतर झाले. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तब्बल 57 नगरसेवक विजयी झाले. पक्षाची एकहाती सत्ता आल्यामुळे पक्षातील अनेकांना पदांची अपेक्षा निर्माण झाली. त्यावेळी पक्षातल्या नेतृत्वाने पक्षातील अनेकांना संधी मिळावी, यासाठी पदाचा दहा दहा महिन्यांचा कालावधी ठरविण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. पदाचा कालावधी संपल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी राजीनामा द्यायचा त्या जागेवर दुसऱ्यांना संधी द्यावयाची असा निर्णय मान्य करण्यात आला. त्यानुसार पदाची नियुक्तीही झाली. मात्र आता नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यावरून पक्षात सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. पक्ष नेतृत्वाने आदेश देऊनही आता त्याबाबत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे नेतृत्वाने आश्‍वासन दिलेले नवीन नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र, त्यांना संधी मिळत नसल्याने आता पक्षांतर्गत वादही सुरू झाले आहेत. 

नक्की वाचा :  अबब...काय सांगतात.. एकाच दिवशी पकडले की.. सात अजगर ! 
 

वादामुळे फुटीचा धोका 
महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत धुमसणाऱ्या या वादामुळे फुटीचा धोकाही निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत शिवसेना एकमेव विरोधी पक्ष आहे. मात्र, पक्षाचे महापालिकेतील नेतृत्व अत्यंत सक्षम आहे. तसेच त्यांना महापालिकेतील राजकीय खेळीही माहीत आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने ही अंतर्गत धुसफूस वेळीच शमविली नाही, तर महापालिकेत भाजपचा "मध्यप्रदेश'होण्याचा धोकाही नाकारता येणार नाही. कारण राज्यातील सत्तेत शिवसेना आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आगामी काळात अंतर्गत वाद शमविण्याबाबत काय भूमिका घेणार याकडेच आता लक्ष आहे. 

आर्वजून पहा : भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Sundopasundi in BJP in municipal corporationInternal blurring from the appointment of an officer