कोरोनाचा कृषिक्षेत्रालाही दणका; पोल्ट्री, शेतमालाचेही भाव गडगडले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

भारतामध्येही सध्या अल्प प्रमाणामध्ये असला, तरी भीतीदायक वातावरण आहे. यामुळे या विषाणूजन्य रोगाचा फटका सर्व क्षेत्राला बसलेला आहे. यात कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसलेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

रावेर  : संपूर्ण जगात व देशांमध्येही कोरोना विषाणूचा फिवर वाढत असल्याचे आकड्यावरून चित्र स्पष्ट होत आहे. याचा फटका पोल्ट्री फार्मला बसला आहे. शिवाय गहू, मका, हरभरा यांच्या पशुखाद्याला पोल्ट्रीकडून उठाव नसल्याने यावर्षी या धान्यांचे भावही मोठ्या प्रमाणात घसरले आहे. ते अजून घसरण्याची शक्‍यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. 

चीनमधून कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तो आज जवळपास जगातील शंभर देशांमध्ये पोहोचलेला आहे. भारतामध्येही सध्या अल्प प्रमाणामध्ये असला, तरी भीतीदायक वातावरण आहे. यामुळे या विषाणूजन्य रोगाचा फटका सर्व क्षेत्राला बसलेला आहे. यात कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसलेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

नक्की वाचा :  अबब...काय सांगतात.. एकाच दिवशी पकडले की.. सात अजगर ! 
 

धान्याचे भाव गडगडले
चे भाव गडगडले यावर्षी गेल्या पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका, कापूस या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळाला. यंदा रब्बी हंगामात चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा असताना थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांचे उत्पादन सुमारे वीस ते पंचवीस टक्‍क्‍याहून अधिक घटण्याची शक्‍यता आहे. सध्या हरभरा व गहू पिकाच्या काढणीस शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. यातून या पिकांचे उत्पादन घटत असल्याचे निदर्शनास येत आहे. कमी उत्पादनाचा फटका बसत नाही, तोच कोरोना व्हायरसची निव्वळ चर्चा कृषिमालावरही उठली आहे. रावेर तालुक्‍यात यंदा गहू 6820 हेक्‍टर, मका 6481, तर हरभरा 11,479 हेक्‍टर पेरणी झाला आहे. 

आर्वजून पहा : भोंदूबाबाचा प्रताप...पूजेसाठी बोलावले...मग केली अश्‍लिल व्हिडीओ क्‍लिप !
 

धान्याचे गतवर्षीचे भाव कंसात यंदाचे भाव 
गहू - 1800 ते 2151 (1600 ते 1910) 
मका - 1300 ते 1700 (1200 ते 1300) 
हरभरा - 3900 ते 4200 (3400 ते 3510) 

क्‍लिक कराः महापालिकेत भाजपमध्ये सुंदोपसुंदी; पदाधिकारी नियुक्तीवरून अंतर्गत धुसफूस
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona also boasts of agriculture Poultry and commodity prices also fell