ट्रकमध्ये जुगार खेळणारे आठ जण पोलिसांच्या ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जळगाव : शहरातील अवैधधंदे चालविणाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाईचा फास आवळल्यानंतर जुगाऱ्यांनी चक्‍क ट्रकमध्ये जुगार अड्डे थाटल्याचे आढळून आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील काशिनाथ चौकात ट्रकमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून नऊ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. 

जळगाव : शहरातील अवैधधंदे चालविणाऱ्यांवर पोलिस अधीक्षकांनी कारवाईचा फास आवळल्यानंतर जुगाऱ्यांनी चक्‍क ट्रकमध्ये जुगार अड्डे थाटल्याचे आढळून आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील काशिनाथ चौकात ट्रकमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून नऊ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. 
काशिनाथ चौकातील फॅक्‍ट्री समोर आणि बाजूला मालवाहतूक ट्रकचालकांचा थांबा आहे. दिवसभर माल भरण्यासाठी उभ्या राहणाऱ्या ट्रकमध्ये जुगाऱ्यांनी धंदा मांडल्याची माहिती निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, विशाल सोनवणे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांच्या पथकाने महामार्गाच्या बाजूला उभ्या केलेल्या ट्रकमध्ये जुगार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकवर चढून यातील संशयितांना अंगझडती घेत खाली उतरविले. 

...यांना घेतले ताब्यात 
कारवाईत संशयितांकडून ताब्यात घेतलेला मुद्देमाल असा : सिकंदर हकीम पटेल (वय 30, रा. पोलिस कॉलनी) याच्या अंगझडतीत जुगाराच्या घोळातील 930 रुपये, लखन रामदास पवार (वय 30, रा. कुसुंबा)- 800 रुपये, सलमान गुलामनबी चौधरी (वय 29, मेहरुण) - 700 रुपये, शरद श्रावण सोनवणे (वय 39, वर्ष, रा. रामेश्वर कॉलनी) - 400 रुपये, हेमंत मुकुंदराव पाटील (वय 41, गीताईनगर) - 450 रुपये, शहाबुद्यीन शेख सलिमोद्दिन (वय 37, रा. पोलिस कॉलनी), महंमद हनीफ गुलाम मुर्तुजा (वय 73, रा. सदाशिव कॉलनी) - 500 रोख, गोपाळ गोविंदा सोनवणे (वय 33, रा. रामेश्वर कॉलनी), टाटा कंपनीचा ट्रक (एमएच 01, एल 2403) - 8 लाख 50 हजार, 22 हजारांचे 7 मोबाईल फोन, असा एकूण 8 लाख 99 हजार 980 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी गोविंदा पाटील याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jugar truck 8 arrest