नियमांना हरताळ फासत "कॅम्पस'मध्ये "जंक फूड'ची चलती 

अंकुश सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

जळगाव : आरोग्याला घातक आणि आजाराला आमंत्रण देणारे "जंक फूड' व "फास्ट फूड' खाणे टाळावे, ैअसे सांगितले जाते. शिवाय, शालेय व महाविद्यालयीन "कॅम्पस'मध्ये ही बंदी असताना महाविद्यालयातच यांच्या भट्ट्या चालविल्या जात आहेत. यासंदर्भात "यूजीसी'ने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत महाविद्यालय आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये चटपटीत "फास्ट फूड'चे पदार्थ बनविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 

जळगाव : आरोग्याला घातक आणि आजाराला आमंत्रण देणारे "जंक फूड' व "फास्ट फूड' खाणे टाळावे, ैअसे सांगितले जाते. शिवाय, शालेय व महाविद्यालयीन "कॅम्पस'मध्ये ही बंदी असताना महाविद्यालयातच यांच्या भट्ट्या चालविल्या जात आहेत. यासंदर्भात "यूजीसी'ने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करत महाविद्यालय आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये चटपटीत "फास्ट फूड'चे पदार्थ बनविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चटपटीत खाण्याची सवय आहे. चविष्ट व विद्यार्थ्यांना भुरळ घालणाऱ्या पदार्थांनी विद्यार्थ्यांमधील रोगांना आमंत्रण देत आहेत. या सवयीला शाळा व महाविद्यालय आवारातच चालना दिली जात आहे. जळगाव शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयीन परिसरात कमी- अधिक प्रमाणात हे सुरू आहे. 

नक्‍की वाचा > झोपडी ते डिजीटल वर्ग 

"यूजीसी'चा नियम धाब्यावर 
मुळात "यूजीसी'अंतर्गत असलेली विद्यापीठ, मान्यताप्राप्त संस्था, महाविद्यालय, शाळा यांच्या परिसरातील कॅन्टीनमध्ये फास्ट फूड किंवा जंक फूड विक्रीस बंदी असल्याचे आदेश आहेत. मात्र, या निर्णयाला तिलांजली देण्यात आली व निर्णय प्रकिया कागदावरच राहिला. यामध्ये महाविद्यालयीन प्रशासनासह पालकांनी देखील दुर्लक्ष केले. 

असे का घडले > चक्‍क मुलाने फौजदाराला उभे केले न्यायालयात

कारवाईची अपेक्षा 
"जंक फूड'मध्ये कचोरी, समोसा, मैद्याचे पदार्थ तर "फास्ट फूड'मध्ये पिझ्झा, बर्गर, चिप्स, चायनीज सर्रासपणे विक्री सुरू आहे. "फास्ट फूड'च्या या जमान्यात अनेक नवीन आजारांनी तोंड वर काढले आहे. लहान मुलांना देखील आजार आहेत. यामुळे असे पदार्थ खाण्यास डॉक्‍टर देखील वर्ज्य करत असतात. पण शाळा आणि महाविद्यालयातच विक्री होते, अशा कॅन्टीनचालकांवर व महाविद्यालयावर विद्यापीठ व अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जंक फूड व फास्ट फूडच्या नियमित सेवनाने लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच चायनिजमध्ये असणाऱ्या "अजिनोमोटो'मुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो. शरीरात फॅटचे प्रमाण देखील वाढत असून, मुलांमध्ये ब्लड प्रेशर, दिसण्याची समस्या, कार्यक्षमता कमी होणे, किडनी, हृदयाचे गंभीर आजार असे अनेक आजार होत आहेत. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणात पालेभाज्या, कडधान्यांचा उपयोग नियमितपणे केला पाहिजे. 
 डॉ. रवींद्र भंगाळे 

"एफडीए'चे नियम 
- 50 मीटर अंतरापर्यंत "जंक फूड' विक्री करण्यास बंदी आणावी 
- मुलांना घरचे अन्न द्यावे 
- आहारात 18 टक्के हिरव्या पालेभाज्या असाव्यात 
- जास्त मीठ व साखर असलेले पदार्थ मुलांना देऊ नयेत 
- तृणधान्य, कडधान्य, दूध यांचा आहारात समावेश असावा 

"यूजीसी'चा आदेश असा 
विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशात महाविद्यालय, शाळा परिसरात 10 नोव्हेंबर 2016 पासून फास्ट फूड, जंक फुडवर बंदी घातली आहे. तरी देखील निर्णयाची कठोर अंमलबजावणी झालेली नाही. 
------------- 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon junk food tred collage cumpus