कर्जमाफी प्रोत्साहन योजनेचे 50 टक्के लाभार्थी प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जळगाव : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या 25 टक्‍के किंवा जास्तीत जास्त 25 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली परंतु जळगाव जिल्ह्यात 50 टक्के शेतकऱ्यांना अद्यापही त्याचा लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शासनाने मात्र आता आमच्याकडे कोणत्याही याद्या शिल्लक नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पात्र असूनही शेतकऱ्यांना रक्कम मिळणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जाच्या 25 टक्‍के व जास्तीत जास्त 25 हजार रुपये देण्याची घोषणाही केली होती. जळगाव जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत तब्बल सव्वा लाख शेतकऱ्यांनी नियमित फेड केली आहे. त्यामुळे हे शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र होते. त्यानुसार शासनाकडे त्यांनी अर्ज भरून माहितीही पाठविली. 

निम्मे शेतकऱ्यांना रक्कमच नाही 
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्या खात्यावर थेट प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील केवळ 60 हजार शेतकऱ्यांना 130 कोटी 40 लाखाची त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही तब्बल 65 हजार शेतकरी प्रोत्साहन योजना रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. 

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची या शासनाने घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत रकमेची जुळवाजुळव करून कर्जफेड केली. परंतु शासनाने या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या तोंडालाही पाने पुसली आहेत. 
आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: marathi news jalgaon karhmafi yajna