आमदार भोळेंच्या लेटरपॅडचा गैरवापर करून खडसेंविरूध्द चौकशीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरपॅडचा गैरवापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार भोळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. 

जळगावातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटपॅडचा गैरवापर करून राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. खडसे यांच्याकडे केवळ शेती असताना त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, तसेच खडसे यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा आहेत. नोटाबंदीच्या काळात बदलण्यात आलेल्या नोटांच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झाली मात्र दाबण्यात आली त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या लेटपॅडवर जावक क्रमांक मात्र टाकण्यात आलेला नाही. 
याबाबत आमदार भोळे यांनी सांगितले, की याबाबत आपल्याला भाजप प्रदेश कार्यालयाकडून असे काही पत्र दिले आहे काय ? अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर आपण दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या लेटरपॅडचा गैरवापर करण्यात आल्याची तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे व आपले संबंध खराब व्हावेत या उद्देशाने कोणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केले असावे, आपले हे जुने लेटरपॅड आहे. त्यावर जावक क्रमांकही नाही. नवीन लेटरपॅड आपण बदलले आहे. याबाबत पोलिस चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

Web Title: marathi news jalgaon khadse bhole later pad