खडसेंचा सडेतोड बाणा! 

खडसेंचा सडेतोड बाणा! 


महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेला "सळो की पळो' करून सोडणारे आणि सभागृहात त्यांचा तासन्‌तास समाचार घेणारे सर्वांचे लाडके नेते एकनाथराव खडसे ऊर्फ नाथाभाऊ. त्यांचा आज (2 सप्टेंबर) वाढदिवस. त्यानिमित्त.... 

राज्याच्या राजकारणाला 1995 मध्ये कलाटणी मिळाली, ती युतीचे म्हणजे भाजप- शिवसेनेचे सरकार आले व कॉंग्रेसची सत्ता खऱ्याअर्थाने खिंडीत सापडली; ती केवळ (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथराव मुंडे व हिंदू हृदयसम्राट (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या अखंड प्रयत्नाने. कॉंग्रेस सत्तेला महाराष्ट्रात "सळो की पळो' करून सोडणारे व सभागृहात त्याचा तासन्‌तास समाचार घेणारे आमचे सर्वांचे लाडके नेते नाथाभाऊ खडसे. आज (2 सप्टेंबर) त्यांचा वाढदिवस आहे, म्हणून त्यांचे विशेष अभिनंदन अन्‌ शुभकामना...! 
खानदेश म्हणजे कॉंग्रेसचा बालेकिल्ला. येथे मधुकरराव चौधरी तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे साम्राज्य होते. या साम्राज्यात सुरुंग लावला तो नाथाभाऊंच्या अखंड प्रयत्नांनी. त्यांना साथ देणारे डॉ. राजेंद्र फडके, गिरीशभाऊ महाजन, डॉ. गुणवंतराव सरोदे, वाय. एम. महाजन सर, डॉ. बी. एफ. आबा, (कै.) मेंडकी यांचे मार्गदर्शन व साथ होती. (कै.) डॉ. अविनाश आचार्य तसेच संघपरिवाराचे संघटन याच्या जोरावर नाथाभाऊंनी खानदेशात कॉंग्रेसशी जोरदार टक्कर दिली. परिणामी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्ह्यात फक्त नावालाच उरली आहे. 
या गोष्टीसाठी सांगायच्या आहेत, की भाजपच्या महाराष्ट्रातील साम्राज्याची मुहूर्तमेढ कुणी रचली असेल, तर ती नाथाभाऊंच्या भगीरथ प्रयत्नांनी. नाथाभाऊंचे श्रेष्ठत्व कुणीच नाकारू शकत नाही. 2014 मध्ये पुन्हा राज्यात भाजपची सत्ता आली, ती स्वबळावर. कारण, शिवसेनेची युती तोडून स्वतंत्र निवडणुका लढल्या गेल्या व भाजप शिवसेनेला "भारी' ठरली. युती तोडण्याची जाहीर भाषा नाथाभाऊंनीच मांडली. त्यामुळेच मुख्यमंत्रिपती भाजपचे देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. नाथभाऊ 14 खात्यांचे मंत्री होते. पुढे काही कारणास्तव नाथाभाऊंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला; किंबहुना नाथाभाऊंनी तो स्वतःच दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com