सद्य:स्थितीत युतीची भाजप-सेनेलाही गरज : खडसे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

जळगाव : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत जसा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करून निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही, तशी भाजप-सेना या दोन्ही पक्षांनाही युतीची गरज आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 
दरम्यान, कॉंग्रेससह अन्य पक्षांकडूनही ऑफर आहे, पण चाळीस वर्षांपासून आपण भाजपत आहोत, त्यामुळे पक्षबदलाचा कोणताही विचार आपल्या मनात नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

"कोणत्याही व्यक्तीवर कायम एकाच पक्षाचा शिक्का नसतो' असे विधान खडसे यांनी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर खडसे हे कॉंग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली. त्यावर बोलताना खडसे म्हणाले की, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. कॉंग्रेसनेते डॉ. उल्हास पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्या अनुषंगाने मी जे बोललो त्याबाबत अर्धवटच प्रसिद्ध झाले. या वाक्‍यानंतर उल्हास पाटील यांना उद्देशून मी असेही म्हणालो की "जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही...' पण हे वक्तव्य कुणीही प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे माझ्याविरुद्धची "मीडिया ट्रायल' अद्यापही सुरूच आहे. 
सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पक्की आहे, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे भाजप-सेनेलाही युतीची गरज आहे. भाजपने युतीसाठी अनुकूलता दर्शवली तरी शिवसेना अडून पाहणार हे नक्की. त्यामुळे प्रसंगी स्वबळावर लढण्याची वेळ आली तरी भाजपने तयार असले पाहिजे, अशी पुस्तीही खडसेंनी जोडली. 

Web Title: marathi news jalgaon khadse bjp shena yuti