आम्ही सोबतच : खडसे, महाजन यांचे स्पष्टीकरण 

eknath khadse girish mahajan
eknath khadse girish mahajan

जळगाव : आमच्यात कोणतेही वाद नाही, आम्ही एकमेकांसोबतच आहोत असे स्पष्टीकरण भाजप नेते एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिले. 

श्री. खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले विधानसभेचे तिकीट कापले, असा आरोप केला होता. महाजन यांनीही त्याला उत्तर देत, जर खडसे यांनी पुरावा दिला, तर पक्ष देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहोत असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पक्षात जोरदार संघर्ष असल्याचे दिसत होते. मात्र, अवघ्या एका दिवसात संपूर्ण चित्रच वेगळे दिसून आले 

खडसे, महाजन एकत्र 
जिल्हा परिषद अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भाजप कोअर कमिटीची बैठक भाजप कार्यालयात झाली. या बैठकीस एकनाथराव खडसे व गिरीश महाजन दोन्ही नेते उपस्थित होते. दोघे शेजारी बसून बैठकीस हास्य विनोदही करीत होते. 

आमच्यात वाद नाही 
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी सांगितले, की आमच्यात कोणताही वाद नसून, आम्ही सोबत आहोत. श्री. खडसे यांनीही आपला कोणताही आरोप नाही, केवळ आपण नाराज आहोत. आम्ही सोबत असल्याचे आपण पाहतच आहोत. माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आमच्या कोणताही वाद नाही. "मीडिया'नेच त्याचा विपर्यास केला आहे. आम्ही दोघे एकच आहोत. या शिवाय त्यांची पक्षाची उमेदवारी कापण्याबाबत आपण अगोदरच सांगितले आहे, की आमचा त्यात कोणताही सहभाग नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी खडसेंच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. 


मी पक्षाच्या नेत्यावर कोणताही आरोप केलेला नाही, केवळ नाराजी व्यक्त केली आहे. आता आपण पाहताच आहात आम्ही सोबत आहोत. 
- एकनाथराव खडसे, भाजप नेते 

एकनाथराव खडसे व माझ्यात तसेच पक्षातही कोणताही वाद नाही. आम्ही सोबतच आहोत. आम्ही एका ताटात जेवण करत असतो. त्यामुळे आमच्यात वाद असण्याचे कोणतेही कारण नाही. स्वतः खडसे यांनीच सांगितले, की माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. त्यामुळे आम्ही सर्व सोबत आहोत. 
- गिरीश महाजन, भाजप नेते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com