खानदेशात पावसाचे आगमन 15 जूननंतरच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

जळगाव ः केरळात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर साधारण आठवडाभरानंतर जिल्ह्यात पाऊस येत असतो. हवामान विभागाकडून यंदा उशिराने पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असून, यामुळे जिल्ह्यात 15 जूननंतरच पहिल्या पावसाचे आगमन होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

जळगाव ः केरळात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर साधारण आठवडाभरानंतर जिल्ह्यात पाऊस येत असतो. हवामान विभागाकडून यंदा उशिराने पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असून, यामुळे जिल्ह्यात 15 जूननंतरच पहिल्या पावसाचे आगमन होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

मॉन्सूनचा पाऊस साधारणतः सात जूनच्या दरम्यान कोकणात दाखल होतो. त्यानंतर दहा जूनपर्यंत मुंबईत येऊन यानंतर तीन दिवसांनी मॉन्सूनच्या पावसाचे आगमन जिल्ह्यात होत असते. मात्र यंदाचा मॉन्सून केरळमध्येच उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने, यामुळे पंधरा जूनपर्यंत त्याच्या आगमनाची चिन्हे नाहीत. यंदाचा उन्हाळा उशिराने जाणवू लागला असला, तरी गेल्या दोन महिन्यात उन्हाची तीव्रता खूप जाणवत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. 

वातावरणात बदल अपेक्षित 
जिल्ह्यात सध्या "मे हीट'चा तडाखा जाणवत आहे. यामुळे मॉन्सूनची प्रतीक्षा लागून आहे. दरवर्षी सात ते दहा जून दरम्यान पावसाचे आगमन होत असून त्यानुसार वातावरणात देखील बदल होत असतो. यंदा मात्र उशिरानेच पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता कमी होऊन वातावरणात बदल होणे अपेक्षित आहे. यामुळे थोडा दिलासा मिळू शकेल. 
 
"केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर साधारण सात दिवसांनी जळगावात पाऊस दाखल होत असतो. यंदा मात्र नेहमीपेक्षा किमान आठवडाभर पाऊस लांबण्याची शक्‍यता आहे.' 
- प्रा. एच. एस. महाजन, कृषी विद्यावेत्ता, ममुराबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khandesh mansoon 15 june