कोशागार'कडून एका दिवसात तब्बल 220 बिलांना मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

जळगाव ः "मार्च एन्ड'मुळे सर्वच उद्योजक, व्यापारी, शासकीय कार्यालयांमध्ये व्यवहार पूर्णत्वाकडे धावपळ सुरू आहे. शासकीय निधी कोणत्याही क्षणी मंजूर होऊन खात्यावर जमा होईल, या आशेने आज जिल्हा कोशागार कार्यालय आज सुटीच्या दिवशीही सुरूच होते. आज तब्बल 220 बिलांना मंजुरी देण्यात आली. 

शासकीय निधी खर्च करण्याची मुदत 31 मार्च असते. त्याआत तो खर्च व्हावा लागतो, अन्यथा शासनाकडे जमा करावा लागतो. यामुळे आपल्याला मंजूर निधी 30 मार्चपर्यंत खर्च करण्यावर सर्वच शासकीय कार्यालये भर देतात. अनेकांकडे निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. तो मार्च अखेरच्या दिवसांत येतो. तेव्हा संबंधित बिले कोशागार कार्यालयाद्वारे मंजूर निधीतून बिले अदा केली जातात. ती बिले संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जातात. 

प्राप्त निधी अन बिलांचा ताळमेळ 
कोशागार कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनातर्फे आज दोन- तीन महिन्यांतून संबंधित विभागांसाठी निधी दिला जातो. ती बिले संबंधितांना दिल्यानंतर मार्चअखेर अतिशय कमी विभागांचा निधी अडकलेला असतो. तो शेवटच्या दिवसात येतो. यामुळे आलेला निधी व कोशागार कार्यालयात आलेली बिले यांचा ताळमेळ बसवून बिले अदा केली जातात. 
आर्थिक वर्षाचा उद्या (31 मार्च) अखेरचा दिवस असल्याने उद्या मध्यरात्रीपर्यंत कोशागार कार्यालये सुरू असतील. 

Web Title: marathi news jalgaon koshagar office