"आयपी' क्रमांक न मिळाल्याने प्रयोगशाळेचे काम थांबले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

प्रयोगशाळेत कंपनीकडून सिबीनॅटच्या दोन मशिनरी पाठविण्यात आल्या होत्या. या मशिनवर आतापर्यंत कोरोनाची चाचणी घेतली जात आहे.

जळगाव : कोरोना संशयितांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने जळगाव येथे प्रयोग शाळेला मान्यता मिळालेली आहे. प्रयोगशाळेत आरटीपीसीआर मशिन देखील दाखल झाले आहे. कोरोनाची चाचणी करणारी सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून "आयपी' क्रमांक प्राप्त न झाल्याने प्रयोग शाळेत आज नमुन्यांची तपासणी झाली नाही. 

नक्की वाचा :  डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण... अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर ! 
 

जिल्ह्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेत आरटीपीसीआर हे मुख्य मशिन वैद्यकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत दाखल झाले आहे. यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यासाठी दोन "सीबीनॅट' मशिन मिळाल्या होत्या. यावर आतापर्यंत कोरोनाची चाचणी केली जात होती. परंतु या मशिनवर दिवसभरात केवळ दहा ते बारा अहवाल प्राप्त होत होते. मात्र मंगळवारी पुरवठादार कंपनीने चाचणीसाठी लागणारे मुख्य आरटीपीसीआर हे मशिन वैद्यकीय महाविद्यालयात पोहचविले असून प्रयोगशाळेत आजपासून कोरोनाच्या चाचणीला सुरवात होणार होती. यासाठी संपूर्ण यंत्रणा देखील सज्ज आहे. 

"आयपी' क्रमांक आज मिळण्याची शक्‍यता 
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोग शाळेचे काम पूर्ण झाले आहे. कोव्हीडची तपासणीसाठी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मधून या मशिनवर चाचणीसाठी परवानगी व "आयपी' नंबर अद्याप प्रयोग शाळेला प्राप्त झालेला नाही. हा नंबर उद्या (ता. 21) दुपारपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे, आयपी क्रमांक मिळाल्यानंतर जळगाव प्रयोगशाळेतच कोरोनाची तपासणी केली जाणार आहे. 

क्‍लिक कराः यावल टायगर कॉरिडोर बनलाय संवेदनशील 
 

"सिबीनॅट'वर 10-12च चाचण्या 
प्रयोगशाळेत कंपनीकडून सिबीनॅटच्या दोन मशिनरी पाठविण्यात आल्या होत्या. या मशिनवर आतापर्यंत कोरोनाची चाचणी घेतली जात आहे. मात्र, या मशिनवर केवळ दहा ते बारा जणांचे अहवाल प्राप्त होत आहे. आता आरटीपीसीआर मशिन देखील दाखल झाले आहे. या मशिनवर दिवसभरात तीन शिफ्टमध्ये सुमारे दीडशे रुग्णाच्या अहवालाची चाचणी घेता येणार असल्याने कोरोनाचे अहवाल प्रलंबित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Laboratory work stopped due to non-receipt of IP number