दाखल्यांसाठी स्वयंघोषणा पत्र ठरणार "टाइम सेव्हर' 

अमोल भट
गुरुवार, 14 मार्च 2019

जळगाव : शासनाच्या योजनांचा लाभ वैयक्तिक लाभ घेण्यासाठी असलेल्या अडचणींवर उपाय म्हणून सरकारने तोडगा काढला आहे. स्वयंघोषित प्रमाणपत्र दिल्यावर लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे या पूर्वी शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेक दाखले सादर करावे लागत होते व त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. शासनाने नागरिकांची ही पिळवणूक थांबावी व त्यांची अडचण लक्षात घेत अनेक दाखले व प्रमाणपत्र देणे बंद केले आहेत याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. 

शासनाच्या परिपत्रकानुसार ग्राम विकास विभागाकडून रहिवासी दाखला देण्याची गरज नाही, तसेच विधवा असल्याचा दाखला यासाठी नवऱ्याच्या मृत्यू नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वयंघोषणा पत्र घेण्यात येणार आहे विभक्त कुटुंब दाखला नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाण पत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, शौचालय दाखला, नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, बचतगटांना खेळते भाग भांडवल बॅंकांमार्फत कर्जपुरवठा, कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला देण्याच्या सेवा या पुढे बंद करण्यात आल्या आहेत. 
 
स्वयंघोषणा पत्राचा नमुना 

स्वयंघोषणा पत्रात स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, वय, आधारकार्ड क्रमांक, व्यवसाय, पत्ता ही माहिती लिहून त्यावर स्वतःचा फोटो लावून "या द्वारे घोषित करतो की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती तसेच समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्या शिक्षेस मी पात्र राहीन. तसेच "सदर स्वयं घोषणा पत्राद्वारे मला मिळालेले सर्व लाभ सर्वंकष रित्या काढण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे' असा मजकूर लिहून त्यावर ठिकाण, तारीख टाकून स्वतःची स्वाक्षरी करावयाची आहे. 
 
प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यावश्‍यक ठरणारे दाखले मिळण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आणि वेळेची बचत करणारी ठरेल. 
- सौरभ चौधरी (विद्यार्थी) 

Web Title: marathi news jalgaon late certifecate taime saver