Loksabha 2019 : "जळगाव', "रावेर'साठी 37 जणांचे 60 अर्ज   

Loksabha 2019 : "जळगाव', "रावेर'साठी 37 जणांचे 60 अर्ज   

जळगाव ः लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जळगाव मतदारसंघात 21 उमेदवारांनी 34 अर्ज, तर रावेर मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण दोन्ही मतदारसंघांतील दोन जागांसाठी 37 उमेदवारांनी 60 अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची उद्या (ता. 5) छाननी होईल. त्यात किती उमेदवार अपात्र ठरतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. येत्या सोमवारी (ता. 8) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. 
आज अखेरच्या दिवशी जळगाव मतदारसंघात 15 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले आहेत, तर रावेर मतदारसंघासाठी 12 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. जळगाव मतदारसंघात बहुजन मुक्ती पक्षातर्फे ईश्वर दयाराम मोरे यांनी तीन अर्ज दाखल केले. सुभाष शिवलाल खैरनार, संचेती रूपेश पारसमल, अनंत प्रभाकर महाजन, गनी शाह इस्हाक शाह, संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज, ओंकार चेनसिंग जाधव यांनी दोन अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहेत. 
इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून रऊफ युसूफ शेख यांनी दोन अर्ज, वंचित बहुजन आघाडीकडून अंजली रत्नाकर बाविस्कर यांनी दोन अर्ज, बहुजन समाज पक्षाकडून राहुल नारायण बनसोडे, भाजपतर्फे आमदार उन्मेष भय्यासाहेब पाटील यांनी दोन अर्ज, तर संपदा उन्मेष पाटील यांनी एक अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय जनशक्ती पार्टीकडून (सेक्‍युलर) शरद गोरख भामरे (सुतार), महाराष्ट्र क्रांती सेनेकडून वंदना प्रभाकर पाटील, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाकडून प्रदीप भीमराव मोतीराया, हिंदुस्थान निर्माण दलाकडून संतश्री बाबा महाहंसजी महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे दाखल केले आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, भाजपतर्फे आमदार स्मिता वाघ यांचे अर्ज दाखल आहेत. 
 
रावेर मतदारसंघासाठी आज इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून इम्रान रऊफ खान व रोशन आरा सादिक अली यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. इम्रान रऊफ खान, विजय जगन तंवर, सुनील पंडित पाटील, रवींद्र दंगल पवार यांनी प्रत्येकी एक, तर ज्ञानेश्वर दिवाकर वाणी (फोटोग्राफर) यांनी अपक्ष म्हणून चार अर्ज दाखल केले आहेत. आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाकडून रोहिदास रमेश अडकमोल, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन प्रल्हाद कांडेलकर यांनी दोन अर्ज, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीकडून अजित नामदार तडवी, बहुजन समाज पक्षाकडून योगेंद्र विठ्ठल कोलते, हिंदुस्थान जनता पार्टीकडून मधुकर सोपान पाटील, बहुजन मुक्ती पार्टीकडून गौरव दामोदर सुरवाडे यांनी प्रत्येकी एक अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे दाखल केले आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे, कॉंग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे डॉ. उल्हास पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com