लोकसभा, विधानसभेसाठी प्रशासनाकडून तयारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जळगाव ः देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील निवडणुका पाहता जिल्हा प्रशासनाने लोकसभेची जय्यत तयारी करणे सुरू केले आहे. या निवडणुकीसोबतच जर विधानसभा निवडणूक घेण्याचे आयोगाने आदेश दिल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. दोन्ही निवडणुकांसाठी तीस हजार मतदान कर्मचारी लागणार आहेत. 

जळगाव ः देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतील निवडणुका पाहता जिल्हा प्रशासनाने लोकसभेची जय्यत तयारी करणे सुरू केले आहे. या निवडणुकीसोबतच जर विधानसभा निवडणूक घेण्याचे आयोगाने आदेश दिल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. दोन्ही निवडणुकांसाठी तीस हजार मतदान कर्मचारी लागणार आहेत. 
लोकसभा निवडणुसाठी अंतिम मतदारयादी 11 जानेवारी 2019 ला प्रसिद्ध होईल. तीच यापुढील काळातील निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाईल. जिल्ह्यात सुमारे 34 लाख मतदार आहेत. त्यात रावेर व जळगाव दोन मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांसाठी पाच-पाच असे दहा निवडणूक निरीक्षक येणार आहेत. 

दीड लाख नवे मतदार 
जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी मतदारयाद्या दुरुस्ती, नवीन मतदारांची नोंदणी करणे, चुकीचे पत्ते, फोटो, नावात बदल आदी कामे केली. यात एकूण एक लाख 45 हजार नवीन मतदारांची भर पडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची प्रथमच नोंद झाली आहे. 

मतदारांना नोटीस 
ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी आहेत, त्यांना नोटीस देऊन तुमचे मतदान कोठे ठेवायचे ते कळवा, याबाबत नोटिसा देण्यात आल्या. त्यांनी तसे न कळविल्यास कोणत्याही एका ठिकाणी नाव असेल, दुसऱ्या ठिकाणचे नाव रद्द केले जाईल. ज्या मतदारांनी रंगीत छायाचित्र जमा केले नसेल त्यांनाही नोटीस पाठवून ते देण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच पोलिस विभागाने निवडणूककाळात अवैध धंदे रोखणे, हद्दपारीची कारवाई करणे, निवडणूककाळात कायदा-सुव्यवस्था राखणे, अतिसंवेदनशील व संवेदनशील केंद्रे निश्‍चित करणे, प्लॉइंग स्कॉड तयार करणे, पोलिस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करणे, निवडणूककाळात उपलब्ध होऊ शकणाऱ्या बसची माहिती घेण्यात येत आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीस आळा घालण्यासाठी नियोजन करण्यास सांगितले आहे. 
 
आकडे बोलतात... 
 मतदार केंद्रे--3 हजार 646 
 राखीव कर्मचारी--5 ते 20 टक्के 
 मनुष्यबळ-- 26 हजार अधिकारी, कर्मचारी 
 कंट्रोल युनिट-- 4 हजार 354 
 बॅलेट युनिट-- 7 हजार 488 
 वाहने-- 2 हजार 321 वाहने 

लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण केली आहे. 26 हजार कर्मचारी लागतील. चार हजार 354 मतदानयंत्रे असतील. यंदा प्रथमच एक लाख 45 हजार नव्याने मतदार यादीत सामविष्ट करण्यात आले. लोकसभा निवडणुकीचा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. 
- प्रमोद भामरे, निवडणूक उपजिल्हाधिकारी, जळगाव.

Web Title: marathi news jalgaon loksabha vidhansabha election