पाचोरा-पुणे लव्हस्टोरी पोचली पोलिस ठाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जळगाव : पाचोरा तालुक्‍यातील सख्ख्या बहिणी पुणे येथे शिक्षण घेतात. एका बहिणीचे तेथील मुलासोबत प्रेम जुळतात. मुलींचे कुटुंब विरोध करून त्यांना घरी आणतात. लग्नाची बोलणी सुरू होते. त्या दोघं बहिणी घर सोडतात. जळगावला मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतात. मुलाचे पालक त्या मुलीला घेण्यासाठी जळगावात येतात. मात्र, काही पुढारी हस्तक्षेप करतात. प्रकरण रामानंद पोलिस ठाण्यात पोचते. विवाह होत नाही तोपर्यंत नेऊ नये, असा आग्रह धरला जातो. पोलिस मध्यस्थी करतात. आशादीपमध्ये रवानगी होते. या ठिकाणी राहण्यास मुली विरोध करतात. अखेर समाजसेविकेकडून लेखी जबाब नोंदवून या मुली त्यांच्या हवाली केल्या जातात. उद्या (ता.

जळगाव : पाचोरा तालुक्‍यातील सख्ख्या बहिणी पुणे येथे शिक्षण घेतात. एका बहिणीचे तेथील मुलासोबत प्रेम जुळतात. मुलींचे कुटुंब विरोध करून त्यांना घरी आणतात. लग्नाची बोलणी सुरू होते. त्या दोघं बहिणी घर सोडतात. जळगावला मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतात. मुलाचे पालक त्या मुलीला घेण्यासाठी जळगावात येतात. मात्र, काही पुढारी हस्तक्षेप करतात. प्रकरण रामानंद पोलिस ठाण्यात पोचते. विवाह होत नाही तोपर्यंत नेऊ नये, असा आग्रह धरला जातो. पोलिस मध्यस्थी करतात. आशादीपमध्ये रवानगी होते. या ठिकाणी राहण्यास मुली विरोध करतात. अखेर समाजसेविकेकडून लेखी जबाब नोंदवून या मुली त्यांच्या हवाली केल्या जातात. उद्या (ता. 22) हा विवाह होणार आहे. 
पाचोरा तालुक्‍यातील दोन बहिणी पुणे येथे शिक्षण घेत होत्या. एका बहिणीचे तिथेच राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेम जुळले. प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतल्याने तिने याबाबत घरी कुटुंबीयांना कल्पना दिली. कुटुंबीयांनी विरोध करून या मुलींना काही दिवसापूर्वीच जळगावला आणले. यानंतर या मोठ्या मुलीचा विवाह जोडण्यासाठी कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी सुरू केली. या मुलीने विरोध केल्यानंतरही नातेवाईक ऐकत नसल्याचे पाहून त्या मुलींनी रविवारी घर सोडून जळगाव येथील विद्यार्थिनीकडे राहिल्या. त्यांनी त्या मुलीला माहिती दिल्यानंतर त्या मुलाचे पालक आज त्या मुलीला घेण्यासाठी जळगावात पोचले. मात्र, काही समाजसेवकांनी त्या ठिकाणी येऊन विरोध केला. अखेर मुलाच्या पालकांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. काही वेळानंतर मुलीसह तथाकथित समाजसेवक व तिचे कुटुंबीय हजर झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी मुलीला विचारणा केली असता तिने मुलाच्या घरी जाण्याचे ठामपणे सांगितले. मुलीचे कुटुंबीय तयार होत असतानाच समाजसेवकांनी लग्न झालेले नसल्याने मुलीला आशादीप वसतिगृहात रवाना करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक कांचन काळे या त्या मुलींना आशादीप वसतिगृहात घेऊन गेल्या. मात्र, तेथील वातावरण पाहून या मुलींनी या ठिकाणी राहण्यास विरोध केला. पुन्हा रामानंद पोलिस ठाण्यात या मुलींना आणले. अखेर समाजसेविकेच्या घरी राहण्यास त्या मुली तयार झाल्या. समाजसेविकेचा लेखी जबाब नोंदवून या मुली त्यांच्या हवाली केल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon love story police