मध्य प्रदेशात गेलेल्या दोन हजार कामगारांना परत आणा...डाळ उद्योजकांचे साकडे  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

कामगार "लॉकडाउन'पूर्वी मध्य प्रदेशात गेले आहेत, त्यांची व आता गेलेल्या काही कामगारांची परत कामावर येण्याची इच्छा आहे.

जळगाव ः जिल्ह्यात डाळ उद्योगांत काम करणारे सुमारे दोन हजार कामगार मध्य प्रदेशातील आहेत. ते जिल्ह्यात येऊन कामे करण्यास तयार आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील प्रशासन त्यांना जळगावमध्ये काम करण्यासाठी येऊ देत नाही. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेऊन कामगारांना जिल्ह्यात आणण्याची मागणी डाळ उद्योजकांनी केली आहे. 

नक्की वाचा :  डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण... अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर ! 
 

जिल्ह्यात दीडशेवर डाळ उद्योग आहेत. केंद्राने परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे मुंबईसह राज्यातील परप्रांतीय "कोरोना'च्या भीतीने गावी रेल्वे, खासगी वाहनांनी जात आहेत. त्यांचे पाहून जिल्ह्यातील डाळ उद्योगासह इतर कंपन्यांमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगारही जात आहेत. मात्र, जे कामगार "लॉकडाउन'पूर्वी मध्य प्रदेशात गेले आहेत, त्यांची व आता गेलेल्या काही कामगारांची परत कामावर येण्याची इच्छा आहे. त्यासाठी मध्य प्रदेश प्रशासन त्यांना योग्य ते पास, वाहनांची व्यवस्था करीत नसल्याचे चित्र आहे. तेथे रोजगार नसल्याने ते परत जळगावमध्ये येण्यास तयार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

आर्वजून पहा :"कोरोना'वर मात करणाऱ्यांचेही शतक पार 
 

डाळ उद्योगांमध्ये काम करणारे कामगार मध्य प्रदेशात त्यांच्या गावी गेले. ते परत येणार आहेत. मध्य प्रदेश शासन त्यांची पास, वाहनांची व्यवस्था करीत नाही. कामगारांअभावी आमचे उत्पादन थांबले आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी कामगारांना परत आणावे. 

 गोविंद मणियार, डाळ उद्योजक 

 

मध्यप्रदेशातील मजूर येथे येण्यास तयार असतील तर त्यांना जळगावला आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. मध्यप्रदेश प्रशासन, स्थानीक प्रशासनाशी बोलणी करू.कामगारांना येथे येण्यासाठी पासेस काढण्यासाठीची व्यवस्था करू. 

आमदार सुरेश भोळे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Madhya Pradesh Bring back two thousand workers