पदाधिकारी नियुक्तीनंतरच प्रशासन काम करणार? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

जळगाव : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका झाल्या. आता सत्तेवर आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदे घेण्यास तब्बल महिनाभराचा कालावधी आहे. तोपर्यंत महापालिका प्रशासन शहरातील कामे ठप्प ठेवणार काय, असा प्रश्‍न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. 
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि मग काय महापालिकेचे प्रशासनही सुस्त झाले. आता महापालिका निवडणूक झाली. नवीन सत्ताधारी कोण होणार, याचीही माहिती झाली. मात्र, त्यांचा पदभार घेण्यास एक महिन्याचा कालावधी आहे. अशा स्थितीत जळगावकरांना मात्र मूलभूत सोयी-सुविधांबाबत लढावे लागत आहे. 

रस्त्यांतील खड्ड्यांचे काय? 
शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे; परंतु महापालिका अद्याप खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यास तयार नाही. अमृत योजनेच्या नावाखाली महापालिकेने सर्वच कामे बंद केली आहेत. बांधकाम विभाग तर लक्ष देण्यास तयार नाही. खड्डे बुजविण्याची तक्रार आली, की "अमृत'चा बाऊ केला जात आहे. तात्पुरते खड्डे बुजविण्यात अमृत योजनेची कोणती अडचण आहे? याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच आता खुलासा करण्याची गरज आहे. नवीन रस्ते करता येत नाहीत; परंतु खड्डे बुजविण्यास समस्या काय आहे? 

विकासासाठी कोटी, सध्या मात्र हाल 
शहराच्या विकासासाठी कोटीच्या कोटी रुपये आल्याचे सांगितले जात आहे. अगदी आता जळगावचे रस्ते "सिंगापूर'सारखे होणार, असे वाटत आहे. कदाचित ते होतीलही; परंतु आता जळगावकरांना खड्ड्यांमुळे हाल सोसावे लागत आहेत. भविष्यात रस्ते चांगले होतील; परंतु सध्या आहेत ते खड्डे बुजविण्याबाबत तरी महापालिकेला आदेश द्यावेत, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

मोकाट कुत्रे, स्वच्छतेचे काय? 
शहरातील मोकाट कुत्रे आणि स्वच्छतेच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत महपालिकेचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही, तर स्वच्छतेच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. अनेक भागात स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सोथरोगांचा प्रादुर्भाव होत आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी मात्र त्याकडे लक्ष देत नाहीत. ते साथरोग पसरण्याची प्रतीक्षा करीत आहेत काय, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात येत आहे. 
 
महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत आपण प्रभाग अधिकारी तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खड्डे बुजविणे, स्वच्छता करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, काम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आपल्याकडेही आल्या आहेत. उद्या (27 ऑगस्ट) आयुक्तांच्या उपस्थितीत पुन्हा आढावा घेण्यात येईल. 
- सुरेश उर्फ राजूमामा भोळे, आमदार 

Web Title: marathi news jalgaon mahapalika prashasan