"लुक एन लर्न' व्हॉटसअप प्रश्नावली स्पर्धेत रुपल राका, मीना राका संयुक्त विजेता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

लुक एन लर्न'द्वारे घरबसल्या सकल जैन संघ जळगाव यांच्या व्हॉट्‌सऍप समुहद्वारे 1 ते 6 एप्रिल दरम्यान दररोज एक प्रश्नावली प्रस्तुत केली गेली. यामध्ये प्रभु महावीर यांच्या जीवन चारित्र अनुसार रोज 18 प्रश्न विचारण्यत आले होते. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे व्हाट्‌सऍपद्वारा निर्देशित नंबरवर पाठवायची होती.

जळगाव : देशभरातील लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये भगवान महावीर स्वामी यांचा 2619 वा जन्मोत्सव सकल जैन श्री संघ जळगाव यांच्यावतीने साजरा झाला. यानिमित्ताने "लुक एन लर्न'तर्फे व्हॉटस्‌ऍप प्रश्‍नावली स्पर्धा घेण्यात आली. यात रूपल राका, मीना राका या संयुक्‍त विजेत्या राहिल्या. 
सकल जैन समाजाची प्रारंभिक मीटिंगमध्ये जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रभु जन्मोत्सव सामुहिकरित्या साजरे न करता सर्व सहभागी मंडल यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून घरबसल्या सहभाग घेता येतील अशा धार्मिक व सामाजिक स्पर्धा घेण्याचे आवाहन केले होते. 

सदरच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत "लुक एन लर्न'द्वारे घरबसल्या सकल जैन संघ जळगाव यांच्या व्हॉट्‌सऍप समुहद्वारे 1 ते 6 एप्रिल दरम्यान दररोज एक प्रश्नावली प्रस्तुत केली गेली. यामध्ये प्रभु महावीर यांच्या जीवन चारित्र अनुसार रोज 18 प्रश्न विचारण्यत आले होते. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे व्हाट्‌सऍपद्वारा निर्देशित नंबरवर पाठवायची होती. यावरुन ही प्रश्नावली देशातील अनेक ठिकाणी पोहचली. देश भरातील अनेक व्यक्तींनी सहभाग नोंदवला. अनेक गणमान्य व्यक्तिनी या उपक्रमाचे कौतुक करत दरवर्षी असा कार्यक्रम घेण्यासाठी आग्रह धरला. 

समजातील सर्व सहभागी सदस्यांचे उत्स्फूर्त सहभागाबद्दल आणि विजेत्यांचे सकल जैन संघ जळगावतर्फे दलीचंद जैन आणि भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या अध्यक्षा भारती रायसोनी व सदस्यांनी अभिनंदन केले. अतिशय नविन्यपूर्ण डिजिटल स्पर्धेत पारितोषिक देखील डिजिटल प्रकारातील पेन- ड्राइव देण्यात येणार असुन जैन धर्मा संबंधित महत्वपूर्ण संकलित माहिती विजेत्यांना देण्यात येणार आहे. सदरिल स्पर्धा आयोजित करण्यात रीना कुमट, कल्पना सांखला, पायल पिपरिया, खुशी मुणोत, चंचल लोढ़ा, कामिनी कामानी यांचे सहकार्य लाभले. 

स्पर्धेतील विजेते 
प्रथम - रूपल राहुल राका, मिना नेमीचंद राका. 
द्वितीय- रितेश रमेशचंद सुराणा, दीपाली विजय कांकरिया 
तृतीय- विजय झुंबरलाल चोपडा, रीता प्रदीप नवलखा 
उत्तेजनार्थ - दिशा अतुल राका, शलाका अजिंक्‍य बनवट. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mahavir jayanti look and learn whatsaap group ques