घरांवर लावणार रेडिओ फ्रिक्‍वेन्सी; तंत्रज्ञानावर आधारित वीज मीटर 

घरांवर लावणार रेडिओ फ्रिक्‍वेन्सी; तंत्रज्ञानावर आधारित वीज मीटर 

जळगाव ः महावितरणच्या जळगाव परिमंडळात पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट 14 शहरात रेडिओ फ्रिक्‍वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात खानदेशातील साधारण 3 लाख सहा हजार ग्राहकांच्या घरांवर नवीन मीटर लागणार आहेत. 

ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक व वेळेत बिले मिळावीत, हा नवीन मीटरप्रणालीचा हेतू आहे. रेडिओ फ्रिक्‍वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज मीटरमुळे मानवी हस्तक्षेप रहित मीटर रीडिंग घेतले जाणार असल्याने ग्राहकांच्या वीजवापराची अचूक व वेळेवर नोंद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलाच्या समस्या असणार नाहीत. सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील 3 लक्ष 6 हजार 27 वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसविले जाणार आहेत. मीटरच्या उपलब्धतेनुसार मीटर बदलण्याचे काम करण्यात येत आहे. एप्रिलअखेर धरणगावात 2009, भुसावळ 16 हजार 504, पारोळा 2461 व चोपडा 351 नवीन वीज मीटर बसविण्यात आले आहेत. 

परिमंडळातील शहरांचा समावेश 
पुनर्रचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल या नऊ शहरांचा समावेश आहे. तर धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर व दोंडाईचा आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या दोन शहरांचा समावेश आहे. 
......... 
तीन लाख ग्राहकांना नवीन मीटर 
जळगाव जिल्ह्यातील नऊ शहरात 1 लक्ष 51 हजार 282, धुळे जिल्ह्यातील 1 लक्ष 14 हजार 827 तर नंदुरबार जिल्ह्यातील 39 हजार 928 सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसविले जाणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com