"महावितरण'च्या विहिरीत आढळली मानवी कवटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली. 

पाणीटंचाईचा काळ असल्याने या विहिरीतील गाळ आणि घाण उपसण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. गाळ उपसत असताना आज अचानक कामगारांनी बाहेर काढलेल्या गाळात मानवी कवटी आणि एक मोठे हाड निघाले. जिल्हापेठ पोलिसांना कळविल्यावर प्रभारी अधिकारी संदीप अराक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर दाखल झाले. 

उशिरापर्यंत शोध 
कामगारांना आणखी गाळ उपसण्यास सांगून इतर काही पुरावे मिळतात काय याचा शोध घेतला. मात्र उशिरापर्यंत केवळ कवटी आणि एक हाड याच्या व्यतिरिक्त काही मिळाले नाही. कार्यालयातील उपव्यवस्थापक चेतन जगन्नाथ तायडे यांनी माहिती दिल्यावरून जिल्हा पेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत. 

उर्वरित हाडे मिळेनात 
मानवी कवटी आणि एक मोठे हाड असे दोनच मानवी अवयवाचे हाडे मिळाल्यावर पुन्हा गाळ उपसून इतर हाडे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काहीही मिळून आले नाही. गाळात जुने वीज मीटर, इतर लोखंडी साहित्य मिळाले. अखेर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले, त्यांनीही बराच प्रयत्न केला. मिळालेली कवटी आणि एक हाड त्यांनी पंचनामा करून ताब्यात घेतले असून, तपासणीसाठी त्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. 
 
चर्चेला उधाण 
महावितरण कार्यालयाच्या आग्नेय कोपऱ्यात अडगळीच्या ठिकाणी ही जुनी विहीर असून, सुमारे चाळीस वर्षांपासून विहिरीतील गाळ काढलेला नव्हता. विहिरीला लागूनच छोटेसे मंदिरही आहे. कार्यालयाबाहेर भटक्‍या समुदायाचे वास्तव असून, पूर्वी वीजमंडळ कार्यालय सायंकाळी बंद झाले की, कोणीही फिरकत नसे. सुरक्षारक्षक तेव्हा नव्हते. परिणामी, घातपात करून डोके आणि हात विहिरीत फेकलाय की, अघोरी विद्या करणाऱ्या तांत्रिकांजवळ असणारी मानवी कवटी आणि हाडापैकी आहे, या चर्चेला उधाण आले आहे. 

Web Title: marathi news jalgaon mahavitaran vihir kavti