औरंगाबाद विभागातील 149 गावांची होणार वीज खंडित 

रविवार, 24 जून 2018

जळगाव ः ग्राहकांनी वेळोवेळी वीजबिल न भरल्याने थकबाकी वाढत गेली. यात "महावितरण'चे अपयशच म्हणावे लागणार आहे. थकबाकीची मागणी करून देखील भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. आता तर वैयक्‍तिक कारवाई न करता 90 ते 100 टक्‍के थकबाकी असलेल्या गावांचाच वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यानुसार औरंगाबाद विभागातून 149 गावांची वीज खंडित केली जाणार आहे. 

जळगाव ः ग्राहकांनी वेळोवेळी वीजबिल न भरल्याने थकबाकी वाढत गेली. यात "महावितरण'चे अपयशच म्हणावे लागणार आहे. थकबाकीची मागणी करून देखील भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. आता तर वैयक्‍तिक कारवाई न करता 90 ते 100 टक्‍के थकबाकी असलेल्या गावांचाच वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यानुसार औरंगाबाद विभागातून 149 गावांची वीज खंडित केली जाणार आहे. 
"महावितरण'चे जळगाव परिमंडळ कार्यालय औरंगाबाद प्रादेशिक विभागाशी जोडण्यात आले आहे. विभागातील औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळात एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत झालेल्या मीटर तपासणी मोहिमेत दहा हजार 25 वीजचोऱ्या उघडकीस आल्या. वीजचोरी करणाऱ्या दोन हजार 599 ग्राहकांकडून तीन कोटी दहा लाख 84 हजार रुपये दंडात्मक रक्‍कम वसूल करण्यात आली; तर दोन हजार 253 वीजचोरांवर वीज कायदा 2003 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 

दीड हजार कोटी थकबाकी 
विजेच्या प्रत्येक युनिटचे बिलिंग होऊन त्याची वसुली दरमहा होणे आवश्‍यक आहे. मात्र, महावितरण अपयशी ठरत आहे. यामुळे थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. यात "महावितरण'च्या औरंगाबाद विभागांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या चार परिमंडळातील घरगुती, व्यापारी, औद्योगिकच्या 19 लाख 25 हजार 415 ग्राहकांकडे एक हजार 499 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. 

गावांची वीज होणार खंडित 
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई झाली आहे. मात्र, वसुली वाढविण्याच्या दृष्टीने महावितरणकडून 90 ते 100 टक्‍के थकबाकी असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यात विभागातील 149 गावांतील 13 हजार 814 ग्राहकांकडे 1606.61 लाख रुपये थकबाकी आहे. या 13 हजार 814 पैकी केवळ 762 अधिकृत वीजग्राहक आहेत. यामुळे सर्व 149 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यात जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव जिल्ह्यातील आठ व नंदुरबार जिल्ह्यातील 29 गावांचा समावेश आहे. 

90 ते 100 टक्के थकबाकी गावांची संख्या 
जिल्हा........गावांची संख्या.........थकबाकी लाख रुपये 
जळगाव...........08.................33.89 
नंदुरबार............29................ 144.99 
औरंगाबाद.........11..................11.19 
जालना.............31..................655.25 
बीड................30..................521.48 
लातूर..............06.................64.86 
उस्मानाबाद........12................. 81.07 
परभणी.............10.................110.00 
हिंगोली.............06.................125.99 
नांदेड...............06.................22.81

Web Title: marathi news jalgaon mahavitaran village electricity