स्त्री अत्याचार निर्मुलन समित्यांची स्थापना न करणाऱ्यांवर कारवाई करा : महिला आयोग अध्यक्षा रहाटकर 

स्त्री अत्याचार निर्मुलन समित्यांची स्थापना न करणाऱ्यांवर कारवाई करा : महिला आयोग अध्यक्षा रहाटकर 

जळगाव ः जिल्ह्यात खासगी कंपन्यांमध्ये अद्यापही स्त्री अत्याचार निर्मुलन समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे दिले आहेत. 

महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांतंर्गत जनसुनावणी घेण्यासाठी श्रीमती राहटकर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, महिला व बाल कल्याण अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. तडवी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून महिलांवरील अन्याय, अत्याचार, छळाचे प्रकार निवारण्यासाठी काय उपाय केले आहेत. नेमकी काय कारवाई केली ? आदी बाबत माहिती घेतली. आढावा घेतला. जनसुनावणी दिवसभर सुरू होती. यात अनेक महिलांनी आपल्या तक्रारी मांडल्या. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com