शासनाचा बुडतोय लाखोंचा महसूल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

जळगाव ः विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून (ता. 7) सुरू केलेला राज्यव्यापी संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. विविध शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांअभावी ओस पडली आहेत. अधिकाऱ्यांना स्वतः फाइल काढून त्यावर सह्या कराव्यात लागत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाकडून मिळणारे विविध प्रकारचे दाखले, प्लॉट, शेत मंजुरीचे पत्र मिळू शकत नाही. महसूल विभागाने वसुलीची कामेही ठप्प केल्याने जिल्ह्यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. 

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू कराव्यात, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला कालपासून सुरवात झाली. शासकीय कर्मचाऱ्यांनी आजही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासह बांधकाम, पाटबंधारे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तलाठी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आदी कार्यालयात आज कामकाज ठप्प होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखेतर्फे शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरू आहे. 
कर्मचारी नसल्याने आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वतः गाडीतून उतरून फाईलींचा गठ्ठा जिल्हाधिकाऱ्यांच्या तळमजल्यावरून त्यांच्या केबिनमध्ये आणला. स्वतःच कार्यालय उघडले. दिवसभर विविध फाइल्स काढून त्यावर सह्या केल्या. अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनीही कार्यालयीन कामे स्वतः केली. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अमोल निकम, निवडणूक अधिकारी प्रशांत भामरे आदी अधिकाऱ्यांनी स्वतःची कामे स्वतःच केली. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय आदी कार्यालयात कर्मचारी नसल्याने नागरिकांना येऊन कार्यालयातून परत जावे लागत आहेत. शाळा, महाविद्यालयातही प्राध्यापकांचा संप असल्याने अनेक महाविद्यालयात आज शुकशुकाट होता.

Web Title: marathi news jalgaon maratha stike mahsul