"मार्च एंडिंग'चा "फिवर' : जि. प.कडे 55 कोटींची बिले सादर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

जळगाव ः जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांत "मार्च एंडिंग'चा फिवर गेल्या पंधरा दिवसांपासून पाहावयास मिळत आहे. यात दोन दिवसांपासून वाढ झाली असून, आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थ विभागासह कोषागार विभागात दिवसभर काम सुरू होते. जि.प.च्या अर्थ विभागात आज विविध विभागांतून कामांची बिले सादर करण्यात आली. यामुळे या विभागाकडून एकाच दिवसात कोषागाराकडे तब्बल 55 कोटींची बिले सादर झाली. त्यात सर्वाधिक सिंचन व बांधकाम, समाजकल्याण विभागाची होती. 

आर्थिक वर्ष संपत असल्याने वर्षभरातील झालेल्या कामांची बिले जमा करण्याची लगबग कालपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. जि. प.च्या अर्थ विभागाकडे फाईल सादर करण्याची व बिले सादर करण्याचे काम आज दिवसभर सुरू होते. आर्थिक वर्षातील अंतिम दोन दिवसांत शासनाकडून विविध खात्यांवर कोट्यवधींचे अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच आज रात्री आठपर्यंत जि. प.तून 55 कोटींची बिले कोषागाराकडे सादर करण्यात आली. शासनाचा निधी "मार्च एंडिंग'पर्यंत खर्च होणे बंधनकारक आहे. अन्यथा हा निधी शासनाकडे वर्ग होतो. त्यामुळे आज जिल्हा परिषदेत (31 मार्च) प्रत्येक विभागाकडून कामांची बिले, टेंडर बिले सादर करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, सिंचन, बांधकाम, आमदार निधी, खासदार निधीच्या कामांची बिले दोन दिवसांत कोषागाराकडे सादर करण्यात आली असून, त्यातील काही बिले खात्यांवर वर्गही झाली. 

उशिरापर्यंत कामकाज 
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात दोन दिवसांपासून प्रत्येक विभागाच्या बिलांचा ओघ सुरू आहे. शासनाकडून शनिवारी व आज विविध खात्यांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर अर्थ विभागाकडून तपासून ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने थेट कोषागार विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. काल रात्री बारापर्यंत विभागात काम सुरू होते. तसेच आजही मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते. 

सर्वच विभाग सुरू 
जिल्हा परिषदेला आज शासकीय सुटी होती. मात्र, "मार्च एंडिंग'ची कामे पूर्ण करणे आणि बिले सादर करण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले होते. त्यामुळे आज सर्वच विभागांचे कामकाज दिवसभर सुरू ठेवत बिले सादर करण्याची लगबग सर्वच विभागांमध्ये सुरू होती. 

Web Title: marathi news jalgaon march end jilha parishad 55 carrore bill