गाळे ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

जळगाव ः महापालिकेच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस बजावल्या आहेत. नोटीस दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच गणपती विसर्जनानंतर गाळे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या हालचाली सुरू आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बघता त्यासाठी बाहेरून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

महापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांच्या गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपली. गाळे ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, प्रशासकीय पातळीवर गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गाळेकारवाई केल्यानंतरचा अहवाल शासनाला पाठविण्याचे पत्र शासनाकडून महापालिकेला मंगळवारी मिळाले आहे. तसेच सेंट्रल फुले मार्केटमधील 973 गाळेधारकांना 81 "क'ची नुकसान भरपाईची नोटीस बजावली होती. मात्र, नऊशे गाळेधारकांनी या नोटीस स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी नऊशे नोटिसा पोस्टाने पाठविल्या असून, पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनानंतर गाळे ताब्यात घेण्याची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला 
गेल्या आठ वर्षापासून गाळे प्रश्‍न प्रलंबित असल्याने गाळे जप्तीची कारवाई थांबलेली आहे. गाळे ताब्यात घेण्याच्या कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महापालिका प्रशासन दक्षता घेत आहे. त्यानुसार कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मागितला असून यासाठी बाहेरून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला असल्याची विश्‍वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. 

आचारसंहितेची अडचण नाही 
गणपती विसर्जनानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून गाळ्यांची कारवाई आचारसंहितेमुळे अडचण येणार नसल्याने गणेश विसर्जनानंतर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon market gade city