जळगावातही "केमोथेरपी' उपचार होणार उपलब्ध : डॉ. भास्कर खैरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

जळगाव ः कर्करोग होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले असून, हा आजार बरा करण्यासाठी यावरील उपचार पद्धती खूप महागडी आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या रूग्णाला देखील उपचार करण्यासाठी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात केमोथेरपीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. यंत्रणा लवकरच सुरू करून रूग्णांना येथे उपचार घेणे शक्‍य होणार आहे. 

कर्करोगावर केमोथेरपी हा उपचार एक चांगला पर्याय मानला जातो. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून राज्यातील दहा जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी सेंटर सुरू करण्यास मान्यता दिली आहे. याअंतर्गत जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग झालेल्या जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी ही पद्धती सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता लागणारे साहित्य, यंत्रसामग्री उपलब्ध करण्यासाठीचे प्रस्ताव देखील तयार करण्यात आले आहेत. यंत्रसामग्री प्राप्त झाल्यानंतर ही सुविधा तत्काळ सुरू होणार आहे. 
 
टाटा हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण 
जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले डॉ. बिराजदार हे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग झाले आहेत. यामुळे महाविद्यालयात सुरू होणाऱ्या कर्करोगाच्या केमोथेरपीच्या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी डॉ. बिराजदार यांना पाठविण्यात आले होते. मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये एक महिना केमोथेरपीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले असून आता त्यांच्या मार्गदर्शनातच सेंटर चालविण्यात येणार आहे. 
 
औषधीही मागविली 
आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात येत असलेले केमोथेरपी उपचार पद्धतीकरीता आवश्‍यक असलेली औषधी देखील मागविण्यात आली आहे. सेंटर सुरू करून औषधी मागविण्यासाठीच्या प्रक्रियेला उशीर लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात औषधी मागविण्यात आल्याचे डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon medical collage camotherpi