मध्यरात्रीचा थरार...चॉपर हल्ला करून आतड्या बाहेर काढल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

कंबरेतून मोठा चाकू काढून दिवान थोरांनी यांच्या पोटात खुपसून थोरांनीच्या पोटातील आतड्याच बाहेर काढला. 

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी तसेच कापड व्यापारी दिवान भिकमचंद थोरानी (वय-51) गल्लीतील रहिवाश्‍या सोबत उभे होते. त्यावेळेस शंभु ऊर्फ सुमीत वंसत वलभानी व त्याचा भाऊ अजीत अशांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद घालून मारहाण केली, सुमीतने कंबरेतून चाकु काढून दिवान थोरांनी यांच्या पोटात खुपसून गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

रेडीमेड कापड व्यापारी दिवान थोरांनी (वय-51) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेल्यावर्षी 2 ऑक्‍टोबरला भारत कुकरेजा, शंभु ऊर्फ सुमित वसंतदास वलभानी यांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले होते. त्या प्रकरणी एमआयडीसी पेलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्ह्याची नोंद होती. बुधवारच्या (ता.4)च्या मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास भाऊ नंदकुमार यांना सोडण्यासाठी आले असतांना गल्लीतील लोकांसोबत उभे असतांना सुमित ऊर्फ शंभु त्याचा भाऊ अजीत असे दोघांनी कंबरेतून मोठा चाकू काढून दिवान थोरांनी यांच्या पोटात खुपसून थोरांनीच्या पोटातील आतड्याच बाहेर काढला. 

क्‍लिक कराः पंचायत समिती सभापती को..गुस्सा क्‍यो आता है!
 

..तर, वाचला असता हल्ला 
घटनेच्या एक दिवस अगोदर सोमवारी रात्री (ता.2) गल्लीतील रहिवाश्‍यां सोबत बोलत असतांना रात्री अकरा वाजता शंभु त्याचा भाऊ अजीत, राकेश हटकर, विठ्ठल हटकर अशांनी दिवान यांच्या घरा समोर येवुन मोहित कोरानी व इतरांना शिवीगाळ दमदाटी केली होती. या प्रकरणी तक्रार न देता आपसात मिटवण्यात आले. परिणामी दुसऱ्याच दिवशी दिवान यांच्यावर हल्ला झाला. 

क्‍लिक कराः साकेगावचा उड्डाणपूल वाहतूकीस खूला 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Midnight shout old man Chopper attack

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: