साकेगावचा उड्डाणपूल वाहतूकीस खूला 

akegaon pool
akegaon pool

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांतर्गत तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरणाच्या कामास दिवसेंदिवस गती येत आहे. गेल्या महिन्यात जळगाव खूर्द जवळील डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजजवळील उड्डाणपूल वाहतूकीस खुला करण्यात आला होता. आजपासून साकेगाव (ता.भुसावळ)येथील उड्डाणपुल वाहतूकीस खुला करण्यात आला आहे. यामुळे जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गाने येण्या जाण्याच्या वेळेत बचत होण्यास काहीसी मदत होणार आहे. 

गेल्या मार्च2019 पासून जळगाव खुर्द (ता. जळगाव) येथील गोदावरी मेडिकल कॉलेजजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू होते. ते 95 टक्के पूर्ण झाले असून, चौपदरीकरणांतर्गत येत असलेला उड्डाणपूल वाहतुकीस "न्हाई'ने खुला फेब्रूवारी 2020 मध्ये खुला केला आहे. त्यामुळे डॉ.पाटील रुग्णालय व महाविद्यालयाजवळील बायपास रस्त्यावरून जाणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारा त्रास वाचला आहे. 

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास तब्बल नऊ महिने अवकाश आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी महामार्ग चौपदरीकरणात साकेगावच्या नदीपुलापासून ते जळगाव खुर्दपर्यंतचे चौपदरीकरण 85 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरून सर्वच वाहने "धूम' वेगाने जातात. डॉ.उल्हास पाटील कॉलेजजवळ मात्र बायपासवरून वाहने वळविली होती. 

जळगाव खुर्द ते साकेगाव दरम्यान येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी दोन वेगवेगळे प्रशस्त रस्ते आहेत. खड्डे नाहीत, दोन-तीन ठिकाणी वळणे आहेत. कोठेही गाडी न थांबविता सहा किलोमीटर अंतर अतिशय वेगात पार करता येते. चिखली ते तरसोद दरम्यान 62.7 किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेल्स्पन कंपनीला देण्यात आले आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये चौपदरीकरणाच्या कामास मुक्ताईनगरपासून सुरवात झाली होती. डॉ.उल्हास पाटील वैदयकीय महाविद्यालयासोबतच साकेगाव (ता.भुसावळ) येथील उड्डाण पुलाचे काम सुरू होते. ते 95 टक्के काम पूर्ण झाल्याने आजसकाळ पासून साकेगाव उड्डाणपुल वाहतूकीस खुला झाला. साकेगाव जवळ आता बायपास व उडडाणपूल असे दोन मार्ग भुसावळकडे जाण्यायेण्यास तयार झाले आहेत. यामुळे येथील बायपासवर दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहतुकीची कोंडी आता सुटणार आहे. 

नाहाटाजवळ बायपास'मार्गाचे काम 
नाहाटा चौफुलीवर व्हेईकल अंडरपास (व्हीयुपी) मंजूर आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. सध्या नाहाटा चौफुलीजवळील दिनदयाळनगरमधील सुमारे दोनशे घरांचे अतिक्रमण काढण्यात आली. यामुळे तेथे पायपास महामार्गाचे काम सुरू झाले आहे. वरणगावला 3.6. किलोमीटरचा बायपास रस्ता काढून शहरांतर्गत होणारी वाहतुकीची कोंडी थांबविली जाणार आहे. नाहाटा चौफुलीजवळील अंडरपासच्या कामासही सुरवात करण्यात आली आहे. 

भुसावळ रेल्वेपुलावर पुल 
महामार्गाच्या चौपदरीकरणात आता भुसावळ रेल्वेपूल, साकरी रेल्वेमार्ग, दीपनगर औष्णिक वीज केंद्राजवळील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भुसावळ रेल्वेपुलासाठी दोन्ही बाजूने भराव टाकून रोडतयार करण्याचे काम वेगात सुुरू आहे. नवोदय विद्यालयाजवळही उड्‌डाणपुलाचे काम सूरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com