Video : पालकमंत्र्यांनी "डीन', "सी.एस.' यांना दिल्या समझोत्याच्या सूचना

sakal impact.j
sakal impact.j

जळगाव : जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात कोवीड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांच्यात "कोरोना' रुग्णाची माहिती देण्यावर सुरू असलेल्या वादाचे पडसाद आज जिल्हास्तरीय आरोग्य समन्वय समितीत दिसून आले. लोकप्रतिनिधींनी बैठकीत जिल्ह्यात कोरोनोची संख्या वाढत आहे, सोबतच कोरोना बाधित रुग्ण मृत होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. यामुळे "डीन', "सी.एस.'मधील वाद संपवा, अन्यथा जिल्हा कोवीड रुग्णालय इतरत्र हलवा, अशी भूमिका मांडली. 
त्यावर "सी.एस.', डीन' यांनी आपसांतील मतभेद बाजूला थांबवा, कोरोनोला प्रतिबंध करण्यासाठी उपाय करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सूचक इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. 

Reply Forward


"सकाळ'ने आज "सी.एस.', डीन'वादात "कोरोना' वेगात' असे वृत्त देत दोघांमधील वाद कसे आहे, कोण कशी दिशाभूल करते, यात कोरोना बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यात कोरोनोच्या मृताची संख्या सर्वाधिक जळगाव जिल्ह्याची आहे असे मांडत, वाद मिटले तर कोरोना' रुग्णांवर चांगले उपचार होतील, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल असे लिहिले होते. त्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी हा मुद्द सभेत मांडत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. 

आमदार पाटील म्हणाले, की जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. दोघा अधिकाऱ्यांच्या वादामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होऊन मृताची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. जर शासन रुग्णालयात कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी सर्व साधनसामग्री पुरविते, आम्ही आमचा निधी देतो. असे असताना पाचोरा तालुक्‍यात रुग्ण दाखल झाला तर त्याला पाणी देण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी जात नाही. कारण त्यांना पीपीटी कीट नाही. ऑक्‍सिजन वेळेवर मिळत नाही, तो लावायला कर्मचारी मिळत नाही. पालकमंत्र्यांनी यात ठोस निर्णय घ्यावा. रुग्ण बरे कसे होतील याकडे लक्ष देण्यास सांगावे. त्यावर पालकमंत्र्यांनी डीन, सी.एस.यांना वरील सूचना दिल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com