आमदार सावकारेंसह डिआरएम यादव यांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

भुसावळ : येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या मालकीच्या जागेचे सुशोभीकरणाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. या संदर्भात संबंधितांनी पोलिस ठाण्यात कुठलीही पूर्व कल्पना दिली नाही. तिथीनुसार शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या रात्री हा प्रकार घडला. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने आमदार संजय सावकारे व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर.के. यादव यांच्यासह दोन नगरसेवक व अन्य अशा नऊ जणांना नोटीस बजाविली आहे. 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी बजावलेल्या नोटिशीत नमूद केले आहे की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली असताना शिवाजी महाराजांचा नवीन अश्वारूढ पुतळा बसविलेला आहे. हा पुतळा बसवीत असताना रेल्वे प्रशासनाने किंवा पुतळा समितीने पोलिस प्रशासनास कोणताही पत्रव्यवहार न करता २३ मार्चला तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर बसविण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकसभेची आदर्श आचारसंहिता असताना कोणताही पत्रव्यवहार न करता पुतळा बसविला. याबाबत योग्य तो खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून २४ तासाच्या आत प्रांताधिकाऱ्यांनी समक्ष सादर करावा. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा खुलासा समर्थनीय नसल्यास कायदेशीर करण्यात येईल. असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. यात ज्या नऊ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांनी खुलासे सादर केले असून सर्व कागदपत्र व हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन असल्याचे सांगण्यात येते. 
 
यांना बजावल्या नोटीस 

पुतळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव हिंगणे, उपाध्यक्ष आमदार संजय सावकारे, सचिव समकित सुराणा, कोषाध्यक्ष निर्मल कोठारी, सदस्य राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, रवींद्र लेकुरवाळे, रिेतेश जैन व डिआरएम आर.के. यादव यांचा समावेश आहे. 

प्रांतधिकाऱ्यांनी त्यांचे काम केले- सावकारे 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी आमदारांसह अन्य नऊ जणांना पुतळा उभारल्याप्रकरणी आचार संहिता भंगाची नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आमदार सावकारे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, प्रांतांनी त्यांचे काम केले आम्ही आमचे काम केले. 

Web Title: marathi news jalgaon MLA savkare notice election comitioner